Monsoon Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Health Care: पावसाळ्यात पोटदुखी टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

पावसाळ्यात पोटाची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Monsoon Health Care: पावसाळा सुरू झाला असून सोबत अनेक आजार देखील घेऊन आला आहे. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण पावसाळ्यात अनेक आजार वाढतात.

पावसाळ्यात अनेक आजार हे डासांशी संबंधित असतात. तसेच पोटांचे विकार वाढतात. त्यामुळे पावसाळ्यात पोट दुखीपासून बचाव करायाचा असेल तर काय करावे हे जाणून घेऊया.

पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाल्याने तसेच दुषित पाणी पिल्याने संसर्ग वाढतो. पावसाळ्यात वेळीच काळजी घेतल्यास पोटदुखीची समस्या कमी होऊ शकते.

पोटदुखीमध्ये अपचन होणे, जुलाब, उलट्या, मळमल होणे, तसेच खाण्याची इच्छा न होणे यासारके प्रकार पावसाळ्यात होतात.

त्यामुळे रस्त्यावरचे उघडे पदार्थ खाणे टाळावे. तसेच बाहेरचे ज्युस पिल्याने पचनक्रियेत बिघाड होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात गरम पदार्थ खावेत. तसेच ताजे पदार्थ खाण्यास प्राधान्य द्यावे.

पावसाळ्यात दूषित पाण्यामध्ये इकोलाय हा जिवाणू आढळून येत असतो. या जिवाणूने पोटात प्रवेश केल्यानंतर पोटाचे कार्य बिघडवून विविध पोटविकारांना आमंत्रण देत असतो.

अशा विकाराच्या आजारांवरील उपचारासाठी काही काळ अँटिबायोटिक्स घ्यावी लागतात. पावसाळ्यात कावीळ होण्याची शक्यता असते. त्यामध्ये हिपेटायटिस ए आणि ई ही कावीळ दूषित पाणी पिल्याने आजार निर्णाम होतात.

  • पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी

  1. पावसाळ्यात वॉशरूममधून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे.

  2. पदार्थ ताजे आणि गरम खावे.

  3. संतुलित आणि पोषक आहार घ्यावा.

  4. नियमितपणे व्यायाम करावा.

  5. आरोग्यतज्ञांचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT