Best Food For Monsoon Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Best Food For Monsoon: पावसाळ्यात आजारांचा वाढता धोका टाळण्यासाठी 'या' 5 पदार्थांचे करा सेवन

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Best Food For Monsoon: पावसाळा सुरू झाला असून सोबत अनेक आजार देखील घेऊन आला आहे. पावसात डासांचाही त्रास होतो. अशावेळी पावसामुळे डास आणि किटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. 

पावसाळ्यात, चुकीचे अन्न खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता. अशावेळी जर तुम्हाला मान्सून आणि पावसाच्या दरम्यान स्वतःला निरोगी आणि फिट ठेवायचे असेल, तर तुम्ही या पदार्थांचा आहारात समावेश करा.  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

पावसाळ्यात या पदार्थांचे करावे सेवन

  • सूप

पावसाळ्यात सूप हे सर्वोत्तम अन्न मानले जाते. सूप पोषक तत्वांनी समृद्ध आहे, ते विषाणू काढून टाकते आणि पावसाळ्यात निर्जलीकरण टाळण्यास देखील मदत करते. आहारात द्रव समाविष्ट करण्याचा हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही भाज्या आणि चिकन सूपनेही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.

  • हर्बल टी

चहा पावसात जास्त प्याला जातो. या दिवसात दूध पिऊ नये, परंतु अशावेळी हर्बल चहा प्यावा. आले किंवा लिंबू मिसळून हर्बल चहा प्यायल्याने तुम्ही आजारांपासून दूर राहाल.

  • फळ

पाऊस आणि पावसाळ्यात हंगामी फळे खाल्ल्याने विषाणू टाळता येतो. या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. चेरी, जांभूळ, केळी या फळांपासून शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात.

  • मेथी आणि जिरे

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, अशा परिस्थितीत मेथी आणि जिरे खाल्ल्याने शरीराची पचनशक्ती आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. या दिवसात या दोन्ही गोष्टींचा आहारात समावेश करावा. हे खूप फायदेशीर आहे.

  • हळद

हळद खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. पावसाळ्यात हळद अनेक फायदे देते. हळदीने घशाचा संसर्गही टाळता येतो. हळदीचे दूध देखील फायदेशीर आहे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

BJP MGP Alliance: गोव्यात भाजप-मगो युती निश्चित; पण जागावाटपाचा फैसला दिल्ली दरबारी!

Shivaji Maharaj Statue: शिवरायांचा पुतळा हटवणार नाही! गोवा सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

खरी कुजबुज: तिकिटासाठी 'रील'बाजी!

Jio Platforms IPO: जिओच्या आयपीओचा नवा विक्रम! अवघ्या 100 मिनिटांत पूर्ण सबस्क्रिप्शन; पहिल्याच दिवशी 3 पट मागणी

SCROLL FOR NEXT