Monsoon Care For Oily Skin Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Care For Oily Skin: पावसाळ्यात अशी घ्या तेलकट चेहऱ्याची काळजी

पावसाळ्यात तुमचा चेहरा चिकट झाला असेल तर तुम्ही मुलतानी माती चेहऱ्यावर लावू शकता.

Puja Bonkile

Monsoon Care For Oily Skin: पावसाळ्यात अनेक लोकांची त्वचा तेलकट होते. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. जर तुमचीही त्वचा तेलकट असेल तर मुलतानी माती वापरू शकता. तेलकट त्वचेसाठी हे खुप फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊया की मुलतानी माती कशी वापरावी.

  • मुलतानी माती आणि गुलाबजल

तुम्ही मुलतानी मातीमध्ये गुलाबजल मिक्स करावे आणि त्वचेवर लावावे. यासाठी दोन चमचे मुलतानी माती घ्यावी. त्यात गरजेनुसार गुलाबजल टाकावे. चांगले मिश्रण तयार करावे. चेहरा स्वच्छ करून हा पॅक लावावा. 15 ते 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा पॅक लावल्याने चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी होतो.

  • मुलतानी माती आणि दही

चिकट आणि तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीमध्ये दही मिक्स करून लावू शकता. त्यामुळे संसर्गाचा धोकाही कमी होतो. मुलतानी माती आणि दह्याचे मिश्रण लावल्याने त्वचा एक्सफोलिएट होते आणि चेहऱ्याची चमकही वाढते. तुम्ही दोन चमचे मुलतानी मातीमध्ये दही मिक्स करू शकता. चेहरा आणि मानेवर लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर पॅक सुकल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

  • मुलतानी माती आणि चंदन पावडर

पावसाळ्यात चेहऱ्यावर चिकटपणा आल्याने पिंपल्स होण्याचा धोकाही असतो. यामुळे मुलतानी मातीमध्ये चंदन पावडर मिसळून लावावे. यामुळे चिकटपणा दूर होऊ शकतो.  एक चमचा चंदन पावडर एक चमचा मुलतानी मातीत मिक्स करावे. त्यात थोडे पाणी टाकावे किंवा गुलाबपाणी मिक्स करून चेहऱ्याला लावावे. आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावल्याने त्वचेवरील चिकटपणा दूर होतो. हे मुरुम आणि मुरुमांपासून देखील संरक्षण करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT