Mobile Battery: जर तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपत होत असेल तर याचा अर्थ फोनची बॅटरी खराब झाली असा होत नाही. फोनची बॅटरी लवकर संपण्यामागे इतर अनेक टेक्निकल कारणे देखील असू शकतात. ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. अशावेळी एखाद्याला फोनसाठी नवीन बॅटरी विकत घ्यावी लागते किंवा नवीन फोन घेण्यास भाग पाडले जाते. पण तुम्ही पुढील पाच गोष्टी केल्यास फोनची बॅटरी लाइफ वाढू शकते.
स्क्रीन ब्राइटनेस
बॅटरी लवकर संपण्याचे मुख्य कारण ब्राइटनेस आहे. यासाठी स्क्रीनचा ब्राइटनेस नेहमी कमी ठेवावा. यामुळे तुमच्या डोळ्यांना देखील त्रास होणार नाही. फोनचा ब्राइटनेस विनाकारण जास्त ठेवू नये. ऑटो-लॉक किंवा स्क्रीन टाइमआउट सेटिंग्ज बदलावे. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लाइफ वाढू शकते.
वाय-फाय ऑप्शन
यूजर्संनी सेल्युलर डेटाऐवजी वाय-फाय ऑप्शन सिलेक्ट करावे. सेल्युलर नेटवर्क खूप उर्जा वापरतात. अशावेळी यूजर्संनी वाय-फायचा वापर करावा. यामुळे फोनची बॅटरी लाइफ वाढते.
लो-पावर मोड
जर फोनची बॅटरी संपत असेल, तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये लो पॉवर मोड अॅक्टिव्ह करू शकता. यामुळे बॅटरी लवकर संपत नाही. यासाठी, प्रथम "सेटिंग्ज" मध्ये जावे. नंतर "बॅटरी" सिलेक्ट आणि नंतर "लो पॉवर मोड" वर टॅप करा.
बॅकग्राउंड ॲप ब्लॉक
बॅकग्राउंड ॲप्स अनेकदा फोनमध्ये चालू राहतात, ज्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते. अशी बॅकग्राउंड ॲप्स बंद करावीत.
लोकेशन शेअरिंग
लोकेशन शेअरिंगमुळे तुमच्या फोनची बॅटरी लकवर संपू शकते. अशावेळी प्रत्येक ॲपसाठी लोकेशन शेअर करू नका. हे थांबवण्यासाठी, "सेटिंग्ज" मध्ये जा, "प्राव्हेसी" वर क्लिक करा, त्यानंतर "लोकेशन सर्व्हिस" वर क्लिक करा. "ऑलवेज" ऐवजी "ॲप युजिंग" पर्याय सिलेक्ट करावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.