Menopause Care and Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Menopause : मेनोपॉजनंतर शरीरात काय बदल होतात? याकाळात स्वत:ची कशी काळजी घ्यायची हे घ्या जाणून

Menopause Care and Tips : रजोनिवृत्ती ही 45 किंवा 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी संपल्याची स्थिती आहे.

दैनिक गोमन्तक

Menopause Care and Tips : रजोनिवृत्ती ही 45 किंवा 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी संपल्याची स्थिती आहे. हे तुमच्या 40 किंवा 50 च्या वयात होऊ शकते आणि मासिक पाळी न येता तुम्ही 12 महिने गेल्यानंतर याचे निदान होते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये सामान्य लक्षणे जसे की योनीमार्गात कोरडेपणा येणे आणि रात्रीचा घाम येणे आहेत.

स्त्रियांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी रजोनिवृत्तीबद्दल जागरुकता आणि समर्थन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. रजोनिवृत्ती म्हणजे तुमची मासिक पाळी बंद होणे. रजोनिवृत्तीचे महिलांना काही फायदे असू शकतात. रजोनिवृत्तीसोबत येणारे काही आश्चर्यकारक आरोग्य फायदे इथे जाणून घ्या. (Menopause Care and Tips)

1. मासिक पाळीपूर्वीची वेदना

मासिक पाळीच्या सुरुवातीस, तुम्हाला तीव्र शारीरिक आणि भावनिक बदल जसे की डोकेदुखी, शरीरदुखी, ओटीपोटात दुखणे इ. गोष्टींचा सामना करावा लागतो. परंतु एकदा रजोनिवृत्ती आल्यावर तुम्हाला ही लक्षणे जाणवत नाहीत. रजोनिवृत्तीनंतर पीएमएस अदृश्य होण्याची शक्यता असते.

2. कमी डोकेदुखी किंवा मूड स्विंग्स

स्त्रियांना त्यांच्या संपूर्ण मासिक पाळीच्या कालावधीत तीव्र मूड स्विंग्ज आणि शरीर वेदना होतात. तर, रजोनिवृत्ती दरम्यान, याची तीव्रता आणि त्रास कमी असतो.

Menopause Care and Tips

3. मासिक पाळी बंद होते

एकदा रजोनिवृत्ती सुरू झाल्यानंतर, तुम्हाला जास्त रक्तस्त्राव आणि मासिक पाळीच्या क्रॅम्पबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण यामुळे आराम मिळतो. रजोनिवृत्तीची सुरुवात अनियमित मासिक पाळीपासून होते त्यामुळे तुम्हाला त्याचा मागोवा ठेवणे आवश्यक आहे. आणि मग हळूहळू तुमची मासिक पाळी बंद होते.

4. ओटीपोटातील वेदना कमी होते

ओटीपोटात वेदना मासिक पाळीच्या आधी आणि दरम्यान उद्भवू शकते. जेव्हा गर्भधारणेदरम्यान आणि रजोनिवृत्तीपूर्वी इस्ट्रोजेनची पातळी जास्त असते तेव्हा गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सचा विकास होतो. मात्र ही वेदना रजोनिवृत्ती नंतर होत नाही.

रजोनिवृत्तीनंतर या गोष्टी ठेवा लक्षात

1. हिरव्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, मासे, सोयाबीन, नट आणि ऑलिव्ह ऑइल यांचा समावेश असलेला संतुलित आहार शरीरासाठी आणि शरीरात होत असलेल्या बदलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.

2. धुम्रपान किंवा मद्यपान करणे टाळा कारण असंख्य अभ्यासातून असे दिसून आले आहे की मद्यपान आणि धूम्रपान केल्याने रजोनिवृत्तीची काही लक्षणे खराब होऊ शकतात.

3. कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड फॅट्स कमी असलेले अन्न खाण्याचा प्रयत्न करा.

4. तुमचे शरीर तंदुरुस्त, निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा.

5. रजोनिवृत्तीनंतर जास्त प्रमाणात कॅफिन पिण्याची सवय आटोक्यात आणा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT