Makeup Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Makeup Tips: मेकअप करण्यापूर्वी प्रायमर लावणे गरजेचे, जाणून घ्या कसे वापरावे

How to Use Primer: मेकअप करण्यापुर्वी प्रायमर कसा वापरावा हे जाणून घेऊया. यामुळे तुमचा मेकअप परफेक्ट दिसेल.

Puja Bonkile

makeup tips how to use primer before makeup read full story

आजच्या कोणताही कार्यक्रम असो किंवा ऑफिसला जाताना महिला मेकअप करतात. मेकअप केल्याने केवळ चेहरा सुंदर दिसत नाही, तर महिलांना एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वासही मिळतो. मेकअप केल्याने चेहऱ्यावरील डाग लपतात, त्यामुळे महिला कितीतरी पटीने सुंदर दिसतात. ज्याप्रमाणे मेक-अपमुळे चेहरा सुंदर होतो, त्याचप्रमाणे चुकीच्या मेकअपमुळे तुमचा लूक खराब होऊ शकतो.

मेकअप करण्याची योग्य पद्धत माहीती असणे गरजेचे आहे. मेकअप करण्यापुर्वी प्राइमर वापरला जातो. लोकांना असे वाटते की ते सामान्य क्रीमप्रमाणे प्राइमर वापरू शकतात, परंतु तसे नाही. प्राइमर लावण्याचा एक योग्य मार्ग देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया मेकअप करण्यापुर्वी प्रायमर कसा वापरावा.

योग्य प्रमाणात वापरा

लोकांना वाटते की ते त्यांना हवे तितके प्राइमर वापरू शकतात, परंतु तसे नाही. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात प्राइमर लावलात तर ते तुमचा लूक खराब होऊ शकतो. जर तुम्ही ते कमी प्रमाणात वापरले तर ते वापरण्याचा कोणताही फायदा होणार नाही.

पापण्यांवर लावा

अनेक लोक पापण्यांवर प्राइमर लावायला विसरतात. यामुळे डोळ्यांचा मेकअप खराब होऊ शकतो. त्यामुळे पापण्यांवरही प्राइमर लावा. यामुळे तुमचा लुक अदिक आकर्षक दिसेल.

चेहरा स्वच्छ धुवावा

कधीच चेहऱ्यावर थेट प्राइमर कधीही लावू नका. सर्वात पहिले चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. यानंतर चेहऱ्यावर थोडी क्रीम लावावी. नंतर प्राइमर वापरा. असे केल्याने प्राइमर चेहऱ्यावर व्यवस्थित सेट होईल.

त्वचा प्रकार ओळखावा

बाजारात अनेक प्रकारचे प्राइमर्स सहज मिळतात. परंतु जर तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन ते खरेदी केले तर ते अधिक फायदेशीर ठरेल. कोरडी त्वचा असलेले लोक स्वतःसाठी मॉइश्चरायझर असलेले प्राइमर्स खरेदी करू शकतात. यामुळे तुमचा मेकअप चांगला होईल.

करू नका या गोष्टी

लोक प्राइमर लावल्यानंतर लगेचच चेहऱ्यावर फाउंडेशन लावू लागतात. यामुळे ते व्यवस्थित सेट होत नाही. प्रायमर लावल्यानंतर सुमारे 5-7 मिनिटांनी फाउंडेशन वापरा. यामुळे मेकअप परफेक्ट दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT