Makeup Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Makeup: लिपस्टिक लावतांना 'ही' चुक टाळा, अन्यथा लुक होऊ शकतो खराब

लिपस्टिक ओठांचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. पण अनेक महिला लिपस्टिक लावताना चुका करतात ज्यामुळे लुक खराब होऊ शकतो.

Puja Bonkile

Lipstick: लिपस्टिक ओठांचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. पण अनेक महिला लिपस्टिक लावताना काही चुका करतात ज्यामुळे लुक खराब होऊ शकतो. यामुळे लिपस्टिक लावतांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

लिपस्टिक लावल्याने चेहऱ्याचा लुक खुप बदलतो. ओठ हा आपल्या चेहऱ्याचा एहत्वाचा भाग आहे. त्यावर योग्य रंगाची लिपस्टिक लावल्यास चेहऱ्याचे सौंदर्य अधिक वाढते. लाल रंग आणि गुलाबी रंगाची लिपस्टिक लावल्याने चेहरा अधिक आकर्षक दिसतो तर लाइट न्युड शेड्सच्या लिपस्टिकने तुमचा साधेपणा दिसून येतो.

लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत

ओठांवर चांगली लिपस्टिक लावल्याने तुमचा चेहरा अधिक सुंदर दिसतो.  ज्या महिलांचे ओठ खूप पातळ आहेत त्यांनी लिपस्टिक लावल्यास त्यांचे ओठ थोडे जाड दिसू लागतात, ज्यामुळे तुमचा चेहरा पूर्वीपेक्षा चांगला दिसू शकतो.

ओठांवर लिपस्टिक लावण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. लिपस्टिक लावण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ओठांना चांगले मॉइश्चरायझ करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून लिपस्टिक सहज लावता येईल. 

यानंतर तुमच्या लिपस्टिकशी जुळणारे लिप लाइनर वापरावे. जेणेकरून तुम्ही तुमच्या ओठांच्या कडा स्पष्ट करू शकता. लिपस्टिक लावताना हे नेहमी लक्षात ठेवा की ते ओठांच्या मधोमध लावायला सुरुवात करा आणि बाहेरच्या बाजूने लावावे. आता टिश्यूच्या मदतीने अतिरिक्त लिपस्टिक काढून टाका.  नतंर ओठ चमकदार दिसण्यासाठी लिपग्लॉस वापरा.

Lipstick

त्वचेच्या रंगानुसार योग्य लिपस्टिक लावावी

  • गोरा रंग

जर तुमच्या त्वचेचा रंग गोरा असेल तर तुम्ही पीच, न्यूड गुलाबी, हलका जांभळा रंग किंवा मॅट लिपस्टिक लावू शकता.

  • सावळा रंग

जर तुमच्या त्वचेचा रंग सावळा असेल तर तुम्ही मरून किंवा ब्राऊन लिपस्टिक लावू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक वाढते.

तसेच लाल रंगाची लिपस्टिक कायम ट्रेंडमध्ये असते. या रंगाची लिपस्टिक प्रत्येक स्किन टोनच्या महिला लावु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT