low blood pressure 
लाइफस्टाइल

Health Benefit: कमी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी करा ''हे'' घरगुती उपाय

दैनिक गोमंतक

आजच्या काळातील आयुष्यात ब्लड प्रेशरची समस्या ही एक सामान्य गोष्ट आहे. काही लोकांना कमी रक्तदाब असतो (Low Blood Pressure) आणि काही लोक उच्च रक्तदाब असल्याची तक्रार करतात. बहुतेक लोकांना उच्च रक्तदाब बद्दल बरेच काही माहित असते. परंतु जेव्हा रक्तदाब कमी होतो तेव्हा काय करायचं याची माहिती फार कमी लोकांना माहिती आहे. कमी रक्तदाब हे हायपोटेन्शन म्हणून देखील ओळखले जाते. जेव्हा शरीरात रक्तदाब कमी होतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की आपल्या मेंदू, हृदय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पुरेसे रक्त नसते. शरीरात पाण्याची कमतरता, औषधाचा वाईट परिणाम, शस्त्रक्रिया किंवा गंभीर दुखापतीमुळे, अनुवांशिक, ताणतणाव, औषधे, खाण्याच्या कमकुवत सवयी, जास्त उपासमार इत्यादी सारखी कमी रक्तदाबांची अनेक कारणे असू शकतात. जर आपण कमी रक्तदाबच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर घाबरून जाण्याची गरज नाही. आपणास माहित आहे का ब्लडप्रेशर पासून औषधाशिवाय देखील मुक्त केले जाऊ शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगतो, ज्याचा उपयोग रक्तदाबाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी केला जाऊ शकतो.या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काही घरगुती उपचारांचा अवलंब करु शकता.(Make home remedies to control low blood pressure)

रक्तदाब समस्येमुळे त्रस्त असल्यास, सेवन करा या गोष्टी

1) तुळस   
तुळस ही औषधी गुणांनी समृद्ध मानली जाते. तुळसमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम तसेच युजेनॉल नावाचा अँटीऑक्सिडंट असतो जो कमी रक्तदाब सहज नियंत्रित करू शकतो.

 2) आवळा  
आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कमी बीपीमुळे चक्कर येत असेल तर आपण मधात मिसळलेल्या आवळ्याचा रस पिऊ शकता. याद्वारे, कमी रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

3) आले    
चहाच्या चवीसाठी अनेकदा आल्याचा वापर करतो . परंतू, तुम्हाला  माहिती आहे का आल्याच्या सेवनाने ब्लड प्रेशरची समस्या नियंत्रित केली जाऊ शकते. दररोज आल्याच्या तुकड्यात लिंबाचा रस आणि खडा मीठ खाल्ल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

 4 ) टोमॅटो  
टोमॅटो ही एक भाजी आहे जी प्रत्येक घरात जवळजवळ दररोज वापरली जाते. कमी रक्तदाबच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी टोमॅटोचा रस हा  खूप फादेशीर ठरू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT