Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Oats Face Scrub: ओट्समध्ये 'हे' पदार्थ मिळसून तयार करा फेस स्क्रब

स्क्रब (Scrub) केल्याने नाकावरील ब्लॅकहेड् (Blackhead) सुद्धा कमी होण्यास मदत मिळते.

दैनिक गोमन्तक

सर्व प्रकारच्या त्वचेसाठी ओट्सचे (Oats Scrub) स्क्रब उपयुक्त आहे. यामुळे चेहऱ्यावरील छिद्रे स्वच्छ होण्यास मदत मिळते. तसेच चेहऱ्यावरील ( Face) मुरूम कमी करण्यासाठी हे स्क्रब फायदेशीर आहे. ओट्स स्क्रब (Oats Scrub) केल्याने नाकावरील ब्लॅकहेड् सुद्धा कमी होण्यास मदत मिळते. ओट्समध्ये व्हिटॅमिन (Vitamins) 'ई' असते. यामुळे त्वचेचा (skin) ओलावा टिकून राहण्यास मदत मिळते. ओट्सपासून अनेक प्रकारचे स्क्रब बनवता येतो. जाणून घेवुया कोणते आहेत ते प्रकार.

* सामान्य ओट्स फेस स्क्रब

या फेस स्क्रबसाठी पहिले ओट्स पावडर तयार करावे. यात 2 चमचे कोमट पाणी मिक्स करावे. नंतर थोडे थंड झाल्यानंतर हे स्क्रब चेहऱ्यावर तसेकहा गळ्यावर लावावे. चेहऱ्यावर 3 ते 4 मिनिटे मसाज करावी. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा स्क्रब करू शकता.

* ओट्स आणि गुलाबजल फेस स्क्रब

हे ओट्सचे (Oats) प्रकार तयार करण्यासाठी 2 चमचे ओट्स पावडर घ्यावे. त्यात 2 चमचे गुलाब जल मिक्स करावे. याचे चांगले मिश्रण बनवावे. हे मिश्रण चेहऱ्यावर तसेकहा संपूर्ण मानेवर लावून मसाज करावी. 5 ते 8 मिनिटे हे मिश्रण चेहऱ्यावर ठेवावे. नंतर पाण्याने स्वच्छ धुवावे. आठवड्यातून हे मिश्रण 2 ते 3 वेळा लावावे.

* ओट्स आणि एलोवेरा फेस स्क्रब

हे स्क्रब तयार करण्यासाठी 2 चमचे ओट्स पावडर घ्यावे. यात कोरफड जेल टाकावे. याचे मिश्रण एकत्र मिक्स करावे. हे स्क्रब सर्व चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे. चेहऱ्यावर हे मिश्रण लावून चांगली मसाज करावी. नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवावे. हे स्क्रब आठवड्यातून 2 ते 3 वेळा चेहऱ्यावर लावावे.

* ओट्स आणि मध फेस स्क्रब

हे स्क्रब तयार करण्यासाठी 2 चमचे ओट्स पावडर तयार करावी. त्यात गरजेनुसार मध मिक्स करावे. यात थोडे पाणी मिक्स करावे. हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच मानेवर लावावे. 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावी. नंतर पाण्याने स्वच्छ धुवावी. हे ओट्स फेस स्क्रब (Oats Face Scrub) आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT