Makar Sankranti 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Makar Sankranti 2024: मकर सक्रांतीला करा 'या' गोष्टींचे दान, भासणार नाही पैशाची चणचण

मकर संक्रांतीला काही गोष्टी दान केल्यास जीवनात सुख-शांती नांदेल आणि कशाचाही कमतरता भासणार नाही.

Puja Bonkile

Makar Sankranti 2024: मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो. शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या शुभ मुहूर्तावर गंगेत स्नान करून दान केल्याने जीवनातील समस्या दूर होतात असे मानले जाते. तसेच सूर्यदेवाची कृपादृष्टी कायम राहते. मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक गोष्टींचे दान केल्याने प्रत्येक कामात यश मिळते. या दिवशी दान केल्याने सुख प्राप्त होते. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते.

खिचडी


मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी दही आणि खिचडी खाल्ली जाते. खिचडीही दान केली जाते. काळ्या उडीद डाळ वापरून खिचडीचेही दान करावे. काळी उडीद शनिशी संबंधित आहे. खिचडी दान केल्याने शनिदोषापासून आराम मिळतो आणि पैशाची कमतरता भासत नाही.

तुपाचे दान


मकर संक्रांतीच्या दिवशीही तुपाचे दान करावे. तुपाचा संबंध सूर्य आणि गुरूशी संबंधित मानला जातो. तसेच तूप हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. याचे दान केल्याने करिअरमध्ये यश आणि सर्व प्रकारचे सुख मिळते.

ब्लँकेट दान


मकर संक्रांती दरम्यान थंडी खुप वाढते. या दिवशी ब्लँकेट दान करणे खूप शुभ मानले जाते. ब्लँकेट दान केल्याने राहू आणि शनि या दोघांशी संबंधित समस्या दूर होतात.  

गूळ दान करणे


हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने गुरू आणि सूर्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ कमजोर असेल तर त्या व्यक्तीने मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान करावे. असे केल्याने मंगळ बलवान होईल आणि तुमचे भाग्य नेहमी तुमच्या पाठीशी राहील. 

काळ्या तिळाचे दान


मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे. या दिवशी तीळ दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी शनिशी संबंधित वस्तूंचे दान केले जाते. काळे तीळ शनिदेवाशी संबंधित आहे. त्यामुळे पाण्यात काळे तीळ टाकून ते सूर्याला अर्पण करावे. यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT