sesame seeds cup cake Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Makar Sankranti 2024: मकरसंक्रातीनिमित्त लहान मुलांसाठी झटपट तयार करा टेस्टी कप केके

तुम्ही मकरसंक्रातीनिमित्त लहान मुलांसाठी तिळापासून खास कप केक देखील तयार करू शकता.

Puja Bonkile

Makar Sankranti 2024: यावर्षी मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांत हा वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो. हिंदू धर्मात या सणाला मोठे धार्मिक महत्त्व आहे.

मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यानंतर दान करणे शुभ मानले जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी खरमास संपतात आणि महिनाभरापासून बंदी असलेली शुभ कार्ये पुन्हा सुरू होतात. या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते.

तिळ-गुळाची वडी किंवा लाडू खायला सगळ्यांना आवडत असलं तरी आजकालच्या मुलांना ते आवडत नाही. तुम्ही यंदा तिळाच्या मदतीने तुमच्या मुलासाठी कपकेक तयार करू शकता. हे बनवायला अगदी सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया कप केक बनवण्याची सोपी पद्धत कोणती आहे.

कप केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 वाटी नाचणीचे पीठ

अर्धा कप तीळाचे पीठ

दीड टीस्पून बेकिंग पावडर

अर्धा कप ऑलिव्ह तेल

1 कप ताक

1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स

2 चमचे तीळ

कप केक बनवण्याची कृती

केक बनवण्यासाठी सर्वात पहिले मायक्रोवेव्ह 180 अंशांवर प्रीहीट करावे. यानंतर, एका भांड्यात सर्व साहित्य मिक्स करावे. आता त्यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करा आणि 2 टेबलस्पून तीळ आणि ताक व्यवस्थित मिक्स करून बॅटर तयार करा.

पीठ तयार झाल्यावर ते चांगले फेटून घ्यावे. जेणेकरून पिठात गुठळ्या राहणार नाहीत. केकचे मिश्रण तयार झाल्यावर काही वेळ बाजूला ठेवा. दरम्यान, कपकेकच्या साच्यावर थोडे तेल किंवा बटर लावून ग्रीस करा.

यानंतर केकच्या साच्यात पीठ घाला. ते सजवण्यासाठी तुम्ही पिठात तीळ घालू शकता.नंतर ते 15 मिनिटे बेक करावे. बेक झाल्यावर बाहेर काढा, थंड करा आणि मुलांना सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

Colva Beach Pollution: कोलवा किनाऱ्याची झाली दैना! कचरा आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ; स्थानिकांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT