Makar Sankranti 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीच्या दिवशी करा 'हे' 8 उपाय, वर्षभर जाणवणार नाही पैशाची कमतरता!

यंदा मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी काही उपाय केल्यास वर्षभर पैशाची कमतरता भासत नाही.

Puja Bonkile

Makar Sankranti 2024: यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो. शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या शुभ मुहूर्तावर गंगेत स्नान करून दान केल्याने जीवनातील समस्या दूर होतात असे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीसाठी शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत, जे केल्यास कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

अर्घ्य द्यावे

मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. पाण्यात लाल फुले, चंदन, काळे तीळ आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यामुळे करिअरमध्ये कोणतीही समस्या येणार नाही.

असे करा स्नान

मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिक्स करून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. प्रत्येक कामात यश मिळते.

हवन

मकर संक्रांतीच्या दिवशी घरी आंब्याच्या लाकडाने हवन करावे. यामध्ये गायत्री मंत्राचा 108 वेळा जप केल्याने घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. घरातील आजार दूर होतात.

या वस्तूंचे करा दान

या दिवशी शनिदेवाला लाल मिठाई, शेंगदाणे, तांदूळ, मूग डाळ, तीळ, लाल वस्त्र, डाळ खिचडी, गूळ दान केल्याने मनुष्य धनवान बनतो.

या वस्तू घरी आणा

मकर संक्रांतीच्या दिवशी लग्नाची भांडी, तीळ, झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे आयुष्यात प्रगती होते.

लग्नाच्या वस्तू दान कराव्या

विवाहित महिलांनी मकर संक्रांतीच्या दिवशी श्रृगांराच्या 14 वस्तू दान कराव्यात. असे मानले जाते की यामुळे पतीचे आयुष्य वाढते. सौभाग्य वाढते. लक्षात ठेवा श्रृगांरासाठी फक्त 14 वस्तू असाव्यात.

पशु-पक्ष्यांची सेवा

मकर संक्रांतीच्या दिवशी मुग्यांना साखर द्यावी, गाईंना हिरवा चारा, माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना बाजरी खाऊ घालणे शुभ मानले जाते.

काळे तीळ

मकर संक्रांतीच्या दिवशी मूठभर काळे तीळ उत्तर दिशेला फेकून द्यावे. असे मानले जाते की यामुळे रोग बरे होतात. कर्जाच्या समस्येतून सुटका मिळेल. कुटुंबात वंशवृद्धी होते. वैवाहिक जीवन आनंदी राहते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT