Mahashivratri 2024 Shubh Muhurat Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mahashivratri 2024 Shubh Muhurat: महाशिवरात्रीला जलाभिषेक करताना कोणत्या गोष्टी ठेवाव्या लक्षात, जाणून घ्या एका क्लिकवर

Mahashivratri 2024 Shubh Muhurat: महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करताना कोणते नियम लक्षात ठेवाे जाणून घेऊया. अन्यथा पूजेचे योग्य फळ मिळणार नाही.

Puja Bonkile

Mahashivratri 2024 Shubh Muhurat rudrabhishek shivling puja reules read full story

यंदा महाशिवरात्री 8 मार्च रोजी साजरी केली जात आहे. भगवान शंकराच्या पूजेसाठी ही तिथी विशेष मानली जाते. असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती कैलासातून पृथ्वीच्या दर्शनासाठी येतात. यामुळेच महाशिवरात्रीला ब्रह्म मुहूर्तापासून रात्रीपर्यंत पूजा केली जाते.

महादेव आणि माता पार्वती यांना प्रसन्न करण्यासाठी भाविक शिवरात्रीचे पूजन आणि उपवास पूर्ण विधीपूर्वक आणि मनापासून करतात.

महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.

तारीख आणि पूजेसाठी शुभ मुहूर्त

दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भक्त उपवास करतात आणि भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा करतात. यंदा महाशिवरात्री हा सण 8 मार्च रोजी साजरा होणार आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी 8 मार्च 2024 रोजी रात्री 9:57 वाजता सुरू होईल, तर 9 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6:17 वाजता समाप्त होईल.


रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या

रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी. शिवलिंगाचा जलाभिषेक करताना दक्षिण दिशेला उभे राहावे म्हणजे तोंड उत्तरेकडे असेल. उत्तर दिशा ही देवी-देवतांची मानली जाते.

महादेवाचा जलाभिषेक करताना पूर्व दिशेला उभे राहू नका. याशिवाय पश्चिम दिशेला उभे राहून शिवलिंगाला जल अर्पण करू नका.

शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे. जल अर्पण करताना शिव मंत्रांचा जप करणे शुभ मानले जाते. शिवलिंगाला जल अर्पण करण्यासाठी चांदी किंवा पितळेची भांडी वापरावीत.

शिवलिंगाला जल अर्पण करण्यासाठी तांब्या किंवा स्टीलच्या भांड्यांचा वापर करू नका. शिवलिंगावर चुकूनही तुळस,हळद आणि कुंकु अर्पण करू नका.

शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा कधीच केली जात नाही. वास्तविक, शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी अतिशय पवित्र असते. त्यामुळे ते शुभ मानले जात नाही. शिवलिंगावर जलाभिषेक केल्यावर जिथून पाणी वाहते त्या ठिकाणाला जलधारी किंवा सोमसूत्र म्हणतात.

यासोबतच माता पार्वती, भगवान गणेश, शिव कन्या अशोक सुंदरी आणि कार्तिकेय जलधारी येथे राहतात, असेही सांगितले जाते. त्यामुळे जर तुम्ही शिवलिंगाला प्रदक्षिणा घालत असाल तर जिथे पाणी वाहत असेल तिथून मागे वळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT