MahaShivratri 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला घरी आणा 'या' गोष्टी, मिळेल सुख-शांती

Mahashivratri 2024: हिंदू धर्मात महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचे व्रत केले जाते.

Puja Bonkile

mahashivratri 2024 buy these things home for blessing and prosperity

हिंदू धर्मात महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. महादेवाला विविध वस्तू अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात. 

त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही वस्तू घरी आणल्या त्यांच्या प्रभावामुळे घरात सुख-समृद्धी वास करते आणि व्यक्तीला अनेक प्रकारचे लाभ मिळतात.

नंदीची मूर्ती

महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीची मूर्ती घरी आणावी. याचे कारण म्हणजे नंदीजी हे भगवान शिवाचे प्रिय आहेत आणि ते एक महान भक्त देखील आहेत. नंदीची मूर्ती घरामध्ये स्थापित केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि घरात येणारे सर्व संकट टळतात. 

पारा शिवलिंग
असे म्हणतात की ज्याच्या घरी पारा धातुचा शिवलिंग असेल ते घर सकारात्मकतेने भरून जाते. पारा शिवलिंग घरात ठेवल्याने सुख-समृद्धी वाढते आणि घरात सकारात्मकता पसरते. घर सुखी होते आणि धनप्राप्ती होते. 

तांब्याचे भांडे

महाशिवरात्रीच्या दिवशी तांब्याचा कलश घरात आणणे देखील शुभ असते. जर तुम्हाला तांब्याचा कलश आणता येत नसेल तर तांब्याचे भांडे नक्कीच घरी आणा. महाशिवरात्रीच्या दिवशी कलश घरात आणल्याने घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात आणि प्रत्येक कार्य शुभतेने पूर्ण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT