Mahashivratri Rangoli Design Ideas: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mahashivratri Rangoli Design Ideas: महाशिवरात्रीला अंगणात काढा 'या' सुंदर रांगोळी डिझाइन

Mahashivratri Rangoli Design Ideas: हिंदू धर्मात घरी अंगणात रांगोळी काढणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात साकारात्मक वातावरण राहते.

Puja Bonkile

Mahashivratri Rangoli Design Ideas

देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. हा विशेष दिवस भोलेनाथला समर्पित आहे. त्यामुळे लोक भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी विविध गोष्टी करतात. अनेक लोक महाशिवरात्रीला दिवसभर उपवास करतात, अनवाणी मंदिरात जातात, भगवान शंकराला बेलची पाने आणि फुल अर्पण करतात.

महाशिवरात्रीला भारतातील जवळजवळ प्रत्येकजण शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी मंदिरात जातो. कारण महाशिवरात्रीला शिवलिंगाला विशेष महत्त्व आहे, या दिवशी भोलेनाथांनी पहिल्यांदा शिवलिंगाचा अवतार घेतला होता. तुम्हालाही भोलेनाथाला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही घरातील अंगणात शिवलिंगाची रांगोळी बनवू शकता. 

तांदळाचा वापर

पांढऱ्या रंगाच्या शिवलिंगाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त मंदिरासमोरील तांदळाची रांगोळी तुम्ही घराच्या अंगणात काढू शकता. असे मानले जाते की जो कोणी शुभ्र शिवलिंगाचे दर्शन घेतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे अशा प्रकारची रांगोळी डिझाइन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

शिवलिंगाची गोलाकार रचना करण्यासाठी तुम्ही गोल झाकण वापरू शकता.

सर्वात पहिले झाकणापासून गोल डिझाइन करा आणि स्केलच्या मदतीने तळाशी एक रेषा काढा.

शिवलिंगावर डोळ्याची रचना करण्यासाठी तुम्ही फक्त निळ्या रंगाचा वापर करू शकता.

Mahashivratri Rangoli

फुलांचा वापर

जर तुमच्याकडे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ नसेल आणि तुम्हाला रांगोळी कशी काढायची हे माहित नसेल तर तुम्ही फुलांनी शिवलिंगाची रांगोळी तयार करू शकता. फुलांच्या साहाय्याने रांगोळी काढणे खूप सोपे आहे. तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी रांगोळी डिझाइन करू शकता

Mahashivratri Rangoli Design

बेलाच्या पानांची डिझाइन

महाशिवरात्रीला बेलाच्या पानाची डिझाइन काढू शकता. बेलाचे पान महादेवाला प्रिय आहे. घरातील अंगणात बेलाचे तीन पान काढू शकता. त्यात शिवलिंग देखील काढू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Casino Traffic Congestion: पणजीतील कॅसिनो परिसरात आता 'नो पार्किंग'; उच्च न्यायालयाचे कडक निर्देश, नियम मोडल्यास कारवाई!

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

SCROLL FOR NEXT