Lunch Box Ideas Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lunch Box Idea: मुलांच्या लंच बॉक्साठी बनवा 'हे' 3 हेल्दी पदार्थ

लहान मुलांना लंच बॉक्समध्ये विविध प्रकारचे पदार्थ हवे असतात.

Puja Bonkile

Lunch Box Idea: अनेक महिलांना मुलांना लंचसाठी डब्ब्यात काय द्यावे हा प्रश्न पडतो. कारण काही मुलं चांगली डिश न दिल्यास उपाशी राहतात. अशा मुलांसाठी जेवणाचे डब्बे तयार करणे अवघड होते. पण तुम्ही पुढील पदार्थ बनवून लहान मुलांना खायला देऊ शकता. जे बनवायला देखील सोपे आणि हेल्दी आहेत.

idali

मिनी इडली

रव्यामध्ये दही आणि पाणी घालून चांगले मिक्स करा आणि मीठ घालावे. थोडा वेळ तसेच राहू द्या. यानंतर ठेवलेल्या रव्याच्या इडलीच्या पिठात इनो घालून फेटून घ्यावे. इडली साचामध्ये आता त्यात रवा पीठ घालून झाकण ठेवून गॅसवर ठेवावे. १५ मिनिटानंतर बाहेर काढावे. मिनी इडल्या तयार आहेत. नारळाची चटणीसोबत आस्वाद घ्यावा.

Chilla

बेसण चिला

बेसनाच्या पिठात हळद, मीठ, जिरं, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, सिमला मिरची घालावी. तुम्ही टोमॅटो देखील घालू शकता. यानंतर पाणी घालून चांगले मिसळा आणि हलके जाडसर पिठ तयार करा. गरम तव्यावर तेलाचे काही थेंब शिंपडा. आता पीठ एका छोट्या चमच्याने तव्यावर ओतावे. एका वेळी चार ते पाच चीले तयार करता येतात. झाकण ठेवून शिजू द्या. नंतर वळून दोन्ही बाजूंनी शिजवा. लंच बॉक्समध्ये सॉससह मुलांना देऊ शकता. हा पदार्थ चवदार आणि आरोग्यदायी आहे.

Upma

उपमा

रव्यात दही आणि मीठ घालून चांगले फेटून घ्या. लोखंडी तव्यावर किंवा नॉनस्टिक तव्यावर तेल टाकावे. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची घाला. भाज्या हलक्या भाजून घ्याव्या. आता शिजण्यासाठी झाकण ठेवा. काही वेळाने झाकण काढून उत्तपम फिरवावे. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी शिजल्यावर उत्तपम तयार होतो. नारळाच्या चटणीसोबत डब्यात पॅक करून देऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT