Monday Fasting| Lord Shiva Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monday Fasting: सोमवारचा उपवास करताना घ्या 'या' गोष्टींची काळजी, मिळेल महादेवाचा आशिर्वाद

अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासात करू नयेत.

दैनिक गोमन्तक

Monday Fasting: हिंदू धर्मात सोमवार हा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे. या दिवशी महादेवाची कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी अनेक लोक उपवास करतात. शिवशंकराला बेल, पांढरे फुल यासारख्या अनेक गोष्टी आज अर्पण केल्या जातात.

परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासात करू नयेत. यामुळे भोलेनाथ तुमच्यावर रागावू शकतात. सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. चला पाहूया.

  • सोमवारचा उपवास करताना या गोष्टी टाळा

सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका. तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दुधाचा संसर्ग होतो.

भगवान शंकराची पूजा करताना शंकराला पंचामृताने स्नान घालावे. शिवलिंगावर जल अर्पण करावे. शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जाईल.

भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही त्यांना कुंकू किंवा टिळा लावू नका. भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते.

ज्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे, त्यांनी हे लक्षात ठेवावे की, पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये. जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या.

  • महादेवाला खूश करण्यासाठी कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या

भोलेनाथला तांदूळ अर्पण करावे. त्यामुळे लोकांच्या जीवनात धनाचा वर्षाव होतो आणि गरीबी दूर होते.

तुम्हांला तुमच्या आयुष्यातील पाप नष्ट करायचे असल्यास महादेवाला तीळ अर्पण करावे.

घर आणि जीवनात सुख समुद्धी आणण्यासाठी जवस अर्पण केले पाहिजे.

संतान प्राप्तीसाठी महादेवाला देवाला गहू अर्पण करावे.

महादेवाला प्रसाद अर्पण केल्यानंतर त्याचे गरीबांमध्ये वाटप करावे.

महादेवालाप्रसन्न करण्यासाठी डमरू वाजवावा.

ज्यांच्या घरात बरेच जण सारखे आजारी असतात त्यांनी शंकराला पाणी वाहावे.

भोग आणि मोक्ष प्राप्तीसाठी शंकराला गंगा जल अर्पण करावे.

  • असे करावे सोमवारचे व्रत

धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरात करु शकता. या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मनापासून पूजा करा आणि यथायोग्य पूजा करा आणि व्रत कथा ऐका. सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते. पण तुम्ही फलाहार करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT