Lord Ram Rangoli: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lord Ram Rangoli: जय श्री राम! या साहित्यांचा वापर करून राम लल्लाच्या स्वागातासाठी दारापुढे काढा सुंदर रांगोळी

Lord Ram Rangoli: प्रभू श्री रामाचे सुंदर रांगोळी काढून स्वागत करू शकता.

Puja Bonkile

Lord Ram Rangoli: आजकाल आपण सजावटीसाठी अनेक गोष्टींची मदत घेतो. कोणताही सण किंवा शुभ समारंभ आला की आपण घरात किंवा दारासमोर रांगोळ्यां काढतो. अयोध्येत प्रभू श्री रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला पारडणार आहे. अयोध्या नगरीत रोषनाई, रंगीत फुलांनी सुंदर पद्धतीने सजरी आहे. देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्याला आपण सगळेच जाऊ शकत नाही, पण घर सजवून प्रभू श्री रामाचे स्वागत नक्कीच करू शकतो. तुम्हाला प्रभू श्री रामच्या नावाने रांगोळीच्या डिझाइन्स काढायच्या असेल तर पुढील पद्धतींनी रांगोळी काढू शकत.

धनुष्यबाण

जर तुम्हाला रांगोळीची सोपी आणि सुंदर डिझाइन काढायची असेल तर धनुष्य बाणाची डिझाइन करून तुम्ही जय श्री राम असे लिहू शकता. रांगोळीत सुंदर रंगांचा वापर करून आकर्षक बनवू शकता. त्यासाठी पांढरा आणि भगवा या दोन रंगांचा वापर करा.

राम मंदीर

जर तुम्हाला तुमच्या दारासमोर श्री राम मंदिराचे दर्शन घडवायचे असेल तर तुम्ही गोल आकारात डिझाईन बनवू शकता. गोलाकारात श्री राम मंदिर बनवू शकता आणि जय श्री राम लिहू शकता. बॉर्डरसाठी रंगीबेरंगी फुले देखील बनवू शकता . हे करण्यासाठी तुम्ही प्लेटची मदत घेऊ शकता.

श्री रामाची रांगोळी

जर तुम्ही रांगोळी काढण्यात एक्सपर्ट असाल आणि मंदिरासमोर वेगवेगळ्या रंगांच्या साहाय्याने रांगोळी काढण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही प्रभू श्री रामाची रांगोळी देखील बनवू शकता. ही सुंदर रांगोळी काढून श्री राम मंदिराच्या स्थापनेचा शुभ सोहळा साजरा करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत साजरा करू शकता.

रंगीत फुलांची

जर तुम्हाला वेगवेगळ्या रंगांचा वापर करून रांगोळी काढायची असेल तर फ्लोरल डिझाइन तुमच्यासाठी योग्य आहे. यासाठी तुम्हाला 4 ते 5 रंग घ्यावे लागतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रांगोळीत प्रभू श्री राम सोबत माता सीतेचे दर्शनही घडवू शकता. फुलांच्या कळ्या तयार करण्यासाठी मॅच स्टिक वापरू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT