Lip Care Tips in Winter Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lip care: थंडीच्या दिवसांत लाल-गुलाबी ओठ हवेत? घरच्याघरी करू शकता 'हे' सोपे उपाय

Lip Care Tips in Winter: थंडीच्या दिवसांत ओठांना भेगा पडतात, ओठ कोरडे पडतात आणि मग नेमकं काय करावं असा प्रश्न पडतो

Akshata Chhatre

Lip Care Tips for Winter in Marathi

थंडीच्या दिवसांत आपली त्वचा रुक्ष होते हे खरं आहे, पण याच बरोबर आपले ओठ सुद्धा बऱ्यापैकी थंडीमुळे कोमेजून जातात आणि अशावेळी काय करावं हे आज जाणून घेऊया. कारण थंडीच्या दिवसांत आपल्याकडून अनेकवेळा ओठांना थुंकी लावली जाते किंवा ओठांची साल ओढून काढली जाते, यामुळे ओठ खराब होतात, दुखतात. लाल-गुलाबी रंगाचे ओठ कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला आपले ओठ मऊ, गुलाबी आणि टवटवीत असावे असं वाटतं. थंडीच्या दिवसांत ओठांना भेगा पडतात, ओठ कोरडे पडतात आणि मग नेमकं काय करावं असा प्रश्न पडतो.

मधाचा वापर करा:

मध आणि लिंबू हे शरीराच्या त्वचेवर अत्यंत गुणकारी असल्याचं सिद्ध झालं आहे, आणि यांचाच वापर तुम्ही तुमच्या ओठांवर सुद्धा करू शकता. मधामध्ये लिंबू मिसळून हे मिश्रण ओठांना लावा, यामुळे ओठ टवटवीत राहायला मदत मिळेल, पण लक्षात घ्या ही प्रक्रिया तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा करायची आहे.

एलोवेरा जेल:

एलोवेरा जेल हे नेहमीच उत्तम मॉइश्च्युराईझर म्हणून वापरलं गेलं आहे. केसांच्या असो किंवा त्वचेच्या बाबतीत कोरफड ही उत्तम पर्याय समजली जाते.

कोरफडीच्या वापराने ओठांचा रंग कायम राहायला मदत मिळते आणि आपोआप नैसर्गिक पद्धतीने तुमचे ओठ सुंदर दिसू लागतात.

बीटाचा वापर करा:

कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण बीटाचा ओठांवर वापर केल्याने ओठांना लाल आणि गुलाबी रंग यायला मदत मिळते. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक बीटाचा काप घेऊन त्याचा पाच मिनिटांसाठी ओठांवर अलगद मसाज करायचा आहे, यामुळे हळूहळू ओठांना बीटाचा रंग यायला मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT