Jeans Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Jeans Cleaning Tips: जीन्स धुताना घ्या खास काळजी,फक्त वापरा हि एक गोष्ट

अनेकवेळा आपण महागडी जीन्स खरेदी करतो, पण दोन वेळा धुतल्यावरच ती जुनी दिसू लागतात.

Puja Bonkile

Jeans Cleaning Tips: आजकाल अनेक लोक जीन्स रोज वापरतात. इतर कापडांच्या तुलनेत जीन्स महाग असते. याची विशेष काळजी घेणे देखील गरजेचे असते. जर तुम्ही इतर कपड्यांप्रमाणे जीन्सला रोज धुतले तर त्याचा रंग झपाट्याने कमी होऊ लागतो आणि दोन ते तीन धुतल्यानंतर तो जुना दिसू लागतो. अशावेळी तुम्हाला तुमची जीन्स वर्षानुवर्षे नवीनसारखी ठेवायची असेल तर सोपी पद्धत वापरू शकता

जीन्स कशी धुवायची?

जर तुमची जीन्स घाण झाली नसेल तर जास्त धुऊ नका. पण जर ते घाण झाले असेल तर बादलीत थंड पाणी घ्या आणि त्यात लिक्विड डिटर्जंट घाला. आता तुम्ही ते विरघळवून त्यात जीन्स व्यवस्थित बुडवा.

जीन्स जास्त प्रमाणात पिळून किंवा घासु नका . तुम्ही ते स्वच्छ पाण्यात धुवावे . आता एका बादलीत पाणी भरून त्यात किमान अर्धा ते

एक कप पांढरा व्हिनेगर टाकावे . आता ते मिक्स करा आणि त्यात धुतलेली जीन्स टाका आणि ५ मिनिटे सोडा.

आता तुम्ही ते पाण्यातून बाहेर काढा आणि ते पिळून टाकण्याऐवजी नळावर किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथून हळूहळू पाणी बाहेर पडेल.

आता हँगरमध्ये लटकवा आणि हवेत लटकू द्या. तुम्‍हाला दिसेल की त्याचा रंग तजेला राहील, इतर वॉशच्या तुलनेत कोरडा आणि कडक होणार नाही.

वास्तविक, पांढरा व्हिनेगर रंग ठीक करण्याचे काम करतो. हे नैसर्गिक सॉफ्टनर म्हणून देखील कार्य करते.

अशा प्रकारे जीन्स धुताना वापरल्यास जीन्स दीर्घकाळ नवीन दिसतील.

  • या गोष्टी लक्षात ठेवा

जीन्स कमी वेळा धुण्याचा प्रयत्न करा.

जेव्हा धुवाल तेव्हा उलटी करून धुवा.

थेट सूर्यप्रकाशात सुकविण्यासाठी टाकू नकात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT