लाइफस्टाइल

आता चिंता होईल दूर; जाणून घ्या स्ट्रेस कमी करण्याचे उपाय

योगाच्या (Yoga) माध्यमातुन स्ट्रेस (Stress) कमी करण्याचे उपाय कोणते ते पाहुयात.

दैनिक गोमन्तक

सध्याच्या काळात प्रत्येक जण यश, पैसा, पद, प्रतिष्ठा यांच्यामागे धावत आहे. त्यामुळे सध्याचं युग हे स्पर्धेचं युग झालं आहे असं म्हटलं जातं. परंतु, या सगळ्यांच्या मागे धावत असताना आपल्याला खरंच समाधान मिळतं का? हा प्रश्न कायम उभा राहतो. सगळी सुखं आपल्या पायाशी लोळण घालावीत असं आपल्याला वाटत असतं. त्यासाठी आपण प्रयत्नही करतो. मात्र, अनेकदा धावपळ, दगदग या सगळ्याचा परिणाम आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत असतो. तिथूनच मग शरीरावर व मनावर ताण म्हणजे स्ट्रेस येण्यास सुरुवात होते. परंतु, हा ताण योगच्या माध्यमातून निश्चितपणे कमी करता येऊ शकतो. म्हणूनच, स्ट्रेस कमी करण्याचे उपाय कोणते ते पाहुयात. (Learn how to reduce stress)

स्ट्रेस कमी करण्याचे उपाय

  1. झोपेची गुणवत्ता सुधारणे.

  2. दररोज व्यायाम व योगासने करणे.

  3. प्राणायाम व ध्यान रोज होणे आवश्यक आहे.

  4. मद्यपान व धूम्रपान करू नये.

  5. स्थूलता कमी करणे.

  6. माफक आणि वेळच्यावेळी आहार घ्यावा.

  7. पाणी भरपूर प्यावे.

  8. दिवसातला काही काळ का होईना फोन, टीव्ही आणि लॅपटॉप शिवाय घालवावा.

  9. निरोगी नाती व संभाषण कौशल्य टिकवावे.

  10. रोज थोडावेळ तरी निसर्गात घालवावा.

  11. कोणत्याही नवीन डाएट ट्रेन्डच्या मागे जाऊ नये.

  12. दिवसातील काही काळ तरी बाह्य विश्व सोडून स्वतः बरोबर राहावे.

कोणताही बदल पटकन किंवा लगेच होत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. मात्र, हे बदल घडून येण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल आणि नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT