marigold flowers
marigold flowers 
लाइफस्टाइल

जखम बरी होण्यापासून ते तणाव दूर करण्यापर्यंत, असे आहेत झेंडूच्या फुलाचे फायदे

दैनिक गोमंतक

आजपर्यंत आपण झेंडूच्या फुलांचे (Marigold flowers) झाड घराच्या गार्डन मध्ये पाहिली असतील किंवा सजावटीकरिता (Decoration) त्याचा वापर होतांना पहिले असतील. परंतु तुम्हाला माहिती आहे का, झेंडूच्या फुलांपासून बनलेला चहा आपल्या आरोग्यास आणि  सौंदर्य वाढविण्यास मदत करते. या फुलात त्वचेवर उपचार करणारे , अँटी-सेप्टिक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. आतापर्यंत लोकांनी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्याचा उपयोग फेस पॅक आणि केसांचे मास्क बनविण्यासाठी केला आहे. परंतु विशेषतः या फुलांना ट्यूमर आणि सायटोटॉक्सिक या आजारावर आळा घालण्यास उपयुक्त आहेत. झेंडूच्या फुलांचे चहा पिण्याचे अनेक फायदे आणि ते बनवण्याचा योग्य मार्ग जाणून घेऊया.  (Learn the benefits of tea made from marigold flowers)

झेंडूची फुलांचा चहा पिण्याचे फायदे - झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यापासून बनवलेल्या चहाचा नियमित सेवन केल्याने  बर्‍याच आजारपासून आराम मिळतो. हे त्वचेवरील जखमा बरे करते आणि मुरुम, इत्यादीपासून देखील मुक्त करते. याशिवाय, त्वचेला वृद्धत्वापासून संरक्षण करून त्वचेवरील पुरळ बरे करण्यास देखील मदत करते. 

तनाव दूर करण्यास मदत - झेंडूच्या फुलात असलेल्या अॅंटीऑक्सीडेंट या गुणधर्मामुळे ट्यूमर, सूज, लाठठापणा, पचनक्रिया आणि मधुमेह या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. अॅंटीऑक्सीडेंट या गुणधर्मामुळे चहा आरोग्यास उपयुक्त ठरतो. 

दातामधील वेदना कमी - दातांमद्धे होणाऱ्या वेदनेवर झेंडूची फुलाचा चहा उपयुक्त आहे. हा चहा थोडावेळ तोंडामध्ये ठेऊन नंतर बाहेर टाकून द्यावे असे केल्याने दातातील वेदना कमी होते. तसेच दातामध्ये होणारे इन्फेक्शन देखील कमी होते. 

बद्धकोष्ठतेवर उपयुक्त - झेंडूच्या फुलांच चहा प्यायल्याने बद्धकोष्ठता, पोटदुखी, अपचन यासरख्या समस्या दूर होतात. यामुळे चयापचय क्रियाद्वारे शरीरातील विष बाहेर काढण्यास मदत मिळते. 

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करते - झेंडूच्या पाकळ्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. या फुलांमध्ये फायटोकॉन्स्टिट्यूएंट्स असतात. यामुळे चेहऱ्यावर वृद्धत्व जाणवत नाही. 

झेंडूचा चहाची कृती - झेंडूचा चहा बनविण्यासाठी 4 ते 5 झेंडूची फुले,  दोन ग्लास पानी आणि मध घ्यावे.  नंतर गॅसवर एक भांड्यात पानी गरम करून घ्यावे. या पाण्यात झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाका. हे पानी चांगले 5 मिनिटे उकळू द्या. पानी चांगले उकल्यानंतर त्याचा रंग पाण्यात उतरतो. नंतर गॅस बंद करावा. शेवटी मध टाकून तुमी चहा सर्व्ह करू शकता. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT