Lakshadweep Tourism Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lakshadweep Tourism: लक्षद्वीपच्या 'या' सुंदर ठिकाणांना द्या भेट

तुम्हीही लक्षद्वीपच्या काही सुंदर ठिकांणांना भेट देऊ शकता.

Puja Bonkile

Lakshadweep Tourism: पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच लक्षद्वीप दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान त्यांनी लक्षद्वीपमधील स्वतःचे काही एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांमध्ये देखील लक्षद्वीपला भेट देण्याची उत्सुकता वाढली आहे. तुम्हीही लक्षद्वीपच्या काही सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.

सागरी संग्रहालय

लक्षद्वीपच्या कावरत्ती बेटावर सागरी संग्रहालय आहे. समुद्राशी संबंधित कलाकृती येथे ठेवल्या आहेत. या संग्रहालयात मासे आणि पाण्यातील प्राण्यांच्या सर्वात जास्त प्रजाती आढळतात. या म्युझियमला ​​भेट देऊन सागरी जीवसृष्टीची माहिती घेऊ शकता.

कावरत्ती बेट

कावरत्ती बेट हे लक्षद्वीपची राजधानी आहे. हे बेट त्याच्या आकर्षक समुद्रातील बेटे, पांढरी वाळू आणि सुंदर दृश्यांसाठी ओळखले जाते. 12 प्रवाळ, पाच जलमग्न किनारे आणि तीन प्रवाळ खडकांसाठी ओळखले जाते. नारळाची सुंदर झाडे आणि जलक्रीडा यासाठी हे बेट अतिशय आकर्षक आहे.

बंगाराम बेट

हिंदी महासागराच्या कडेला निळ्याशार पाण्यात वसलेले बंगाराम बेट हे एक अद्भुत पर्यटन स्थळ आहे. हे बेट त्याच्या मूळ कोरल रीफ आणि समुद्रकिनारे यासाठी ओळखले जाते. जलक्रीडा, डॉल्फिन पाहणे आणि सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी येथे जाता येते.

मिनिकॉय बेट

हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. जे लक्षद्वीपच्या 36 लहान बेटांमध्ये समाविष्ट आहे. स्थानिक भाषेत हे बेट मलिकू म्हणून ओळखले जाते. कोरल खडक, पांढरी वाळू आणि अरबी समुद्राचे आकर्षक पाणी येथे पाहायला मिळते. हे बेट लक्षद्वीपचे दुसरे सर्वात मोठे बेट आहे.

आगत्ती बेट

लक्षद्वीप हे साहसी ठिकाणांनी भरलेले आहे. त्यातील एक आगत्ती बेट आहे. या लहान बेटावर स्वच्छ पाणी, पांढरी वाळू, समुद्रकिनारे आणि अनेक रोमांचक ठिकाणे आहेत. स्नॉर्कलिंग अॅक्टिव्हिटीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही अगात्ती बेटावर जाऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Construction: बेकायदा बांधकामांची माहिती द्यायला टाळाटाळ? पंचायत सचिवांना 10 हजारांहून अधिक दंड! गोवा खंडपीठाचा कठोर इशारा

BJP Election Preparation: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ताकदीनिशी तयारी; भारती पवार-शिवप्रकाशांच्या उपस्थितीत CM सावंत-दामू नाईकांच्या बैठका

खरी कुजबुज: प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार?

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

SCROLL FOR NEXT