Fruit Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fruits For Health: फळे खाणे आरोग्यासाठी गरजेचेच मात्र ती खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहीती आहे का?

Fruits For Health: कारण त्या त्या ऋतुनुसार आपल्या शरिराच्या गरजा वेगळ्या असतात आणि या गरजा ही फळे पूर्ण करतात.

दैनिक गोमन्तक

Fruits For Health: फळे आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानली जातात. आपले शरिरातील पाण्याची कमतरता, व्हिटॅमिन, प्रोटीन, मिनरल्स आणि इतर पोषक घटकांची कमतरता फळांच्या सेवनाने पूर्ण होते. त्यामुळे दररोज फळे खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी फायदे आहेत.

आरोग्यतज्ञांच्या म्हणण्यानुसार, ऋतुनुसार जी फळे आपल्या आजूबाजूच्या परिसरात असतात, उपलब्ध होतात त्या फळांचे आपण सेवन केले पाहिजे. कारण त्या त्या ऋतुनुसार आपल्या शरिराच्या गरजा वेगळ्या असतात आणि या गरजा ही फळे पूर्ण करतात.

मात्र तुम्हाला माहीती आहे का? दररोज फळे खाणे चांगलेच असते मात्र ते कधी खाल्ले पाहिजे? फळे खाण्याची योग्य वेळ कोणती आहे? चला तर जाणून घेऊयात फळे खाण्याची योग्य वेळ कोणती आहे.

भारतातील प्रसिद्ध न्यूट्रीशिनिस्ट निखिल वत्स यांच्या मते सफरचंद, केळी, टरबूज, अॅव्हाकॅडो, आंबा, अननस, चिक्कू ही फळे सकाळी खावीत. या मागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.

1. जीवनसत्त्वे आणि खनिजे

सकाळच्या वेळी फळांचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे लवकर मिळतात. दिवसभराची ऊर्जा तुम्हाला सकाळी फळे खाल्ल्याने मिळते.

2. शरीर हायड्रेटेड राहील

टरबूज आणि संत्री यांसारख्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तुमचा दिवस हायड्रेशनने सुरू होण्यास मदत होते. तुमच्या शरिरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.

3. नैसर्गिक साखर

फळांमध्ये नैसर्गिक साखर आढळते, जी सकाळी तुमची चयापचय क्रिया गतिमान करण्यासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करते.

4. वजन कमी होण्यासाठी फायदेशीर

फळांमध्ये असलेले फायबर पचनास मदत करते आणि तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे आपोआपच तुम्ही इतर पदार्थ कमी खाता. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT