Kitchen Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Tips: किचनमधील भांड्यावर गंजाचे डाग पडले असतील तर करा 'हे' घरगुती उपाय

किचनमधील भांड्यावर गंजाचे डाग पडल्यामुळे तुम्ही जर ते भांडे घराबाहेर फेकुन देत असाल तर ही बातमी आदी वाचा.

दैनिक गोमन्तक

Kitchen Tips: किचनमधील भांड्यांचा अतिवापर झाल्यावर गंज चढू लागतो. ही भांडी घासतांना खुप मेहनत घ्यावी लागते. असे असतानाही भांड्यांतील गंज नीट साफ होत नाही.

त्यानंतर महिला ही भांडी स्वयंपाकघरातून बाहेर काढतात. तुमच्या कोणत्याही भांड्याला गंज लागला असेल, तर ते फेकून देण्याऐवजी या सोप्या टिप्सचा वापर करून त्यांची चमक वाढवु शकता.

किचनमधील गंजलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी काय करावे?

  • बटाटा आणि डिश सोप स्क्रब

तुम्ही स्टीलच्या भांड्यांवर गंजलेले डाग काढण्यासाठी बटाटा आणि डिश सोप स्क्रबचा वपार करु शकता. बटाट्यामध्ये असलेले ऑक्सॅलिक अॅसिड गंजाचे डाग दूर करण्यास मदत करते.

  • कांदा

कांद्याच्या मदतीने तुम्ही गंजलेली भांडी स्वच्छ करू शकता. हा उपाय करून पाहण्यासाठी तुम्हाला गंजलेल्या भांड्यावर कांदा चोळून काही वेळ तसाच ठेवावा लागेल. यानंतर जेव्हा तुम्ही भांडी धुता तेव्हा तुम्हाला दिसेल की भांड्यांमधून गंज स्वतःच बाहेर पडत आहे.

  • बेकिंग सोडा

बेकिंग सोडाच्या एक्सफोलिएटिंग गुणधर्मामुळे भांड्यातील गंज सहज निघतो. हा उपाय करण्यासाठी लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिक्स करुन मिश्रण तयार करा. हे तयार मिश्रण गंजलेल्या भागावर किमान 20 मिनिटे तसंच राहू द्या. यानंतर क्लिनिंग ब्रशने भांडी स्वच्छ करा.

  • लिंबू

लिंबाच्या मदतीने तुम्ही गंजलेली स्टीलची भांडी आणि चाकू स्वच्छ करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लिंबूमध्ये मीठ मिसळून भांडी स्वच्छ करावी लागतील. ही टिप वापरून भांड्यावरील गंज काही मिनिटांत साफ होईल.

  • खोबरेल तेल

खोबरेल तेलाचा केसांना लावल्यास खुप फायदा होतो. हा उपाय करून पाहण्यासाठी तुम्हाला गंजलेल्या भांड्याला खोबरेल तेल लावावे लागेल आणि ते सुमारे एक तास सोडावे लागेल. यानंतर भांड स्वच्छ दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT