Kitchen Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: 'या' 5 ट्रिक्स काही मिनिटांमध्ये स्वयंपाकघर करेल स्वच्छ

तुम्ही पुढील स्मार्ट आणि क्लींनिग हॅक्स वापरून काही मिनिंटामध्ये स्वयंपाकघर स्वच्छ करू शकता.

Puja Bonkile

Kitchen Hacks: स्वयंपाक करताना तुमचाही गोंधळ होतो का? हे केवळ तुमच्यासोबतच नाही तर अनेक लोकांसोबत होते. अनेक वेळा रात्रीच्या जेवणासाठी काय बनवावे हे समजत नाही. स्वयंपाकाची आवड असणाऱ्यांनाही कधीकधी समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या सर्वांना माहित आहे की स्वयंपाक आणि स्वच्छता ही एकाच वेळी होणारी कामे आहेत. जाणून घेऊया अशाच काही हॅक्सबद्दल ज्यामुळे तुम्ही काही मिनिटांमध्ये स्वयंपाक करू शकाल.

  • डाळी आणि मसाले स्टोअर करावे

स्वयंपाक घरात डाळी आणि मसाले भरूण ठेवावे. यामुळे कोणताही पदार्थ बनवतांना तुमची धावपळ होणार नाही.

  • डस्टबिन जवळ ठेवा

कांदा, भाजी कापून झाल्यावर लगेच डस्टबिनमध्ये टाकावे. कारण यामुळे स्वयंपाकघर जास्त खराब दिसणार नाही. लग्च असे केल्याने तुमचे काम देखील वाढणार नाही.

  • स्वयंपाक करण्यापूर्वी एकदा किचन स्वच्छ करा

स्वयंपाक करण्यापूर्वी किचन स्वच्छ करावे. यामुळे तुम्ही लवकर स्वयंपाक करू शकाल. किचन स्वच्छ असेल तर तुमचा गोंधल उडणार नाही. सर्व वस्तू जागेवर ठेवावे.

  • भाज्या आधीच शिजवाव्या

काही भाज्यांना शिजाला खूप वेळ लागतो. मटार, कोबी, गाजर आणि इतर काही भाज्या आहेत. अशा भाज्या पूर्णपणे शिजवल्या पाहिजेत. जर तुम्हाला स्वयंपाक सोपा करायचा असेल तर सर्वात पहिले त्यांना उकळवे. शिजवण्याची तयारी करण्यापूर्वी पाणी उकळावे किंवा मायक्रोवेव्हमध्ये काही मिनिटे उकळवे. त्यानंतर तुम्ही भाज्या परतून किंवा भाजून तयार करू शकता. यामुळे तुमचे जेवण लवकर तयार होईल आणि काम सोपे होईल.

  • काही मिनिटांत भांडी धुवा

तुमच्या स्वयंपाकघरातील सिंकमध्ये भांड्यांचा ढीग असेल तर तुम्हाला स्वयंपाकघरात जावेस वाटत नाही. सिंक स्वच्छ ठेवण्यासाठी आणि भांडी साचू नयेत. म्हणून भांडी एकत्र धुणे अदिक फायदेशीर आहे. जर तुमच्याकडे भांडी धुण्या, वेळनसेल तर सर्व भांडी भिजवून ठेवा. यामुळे भांडी काही मिनिटांमध्ये स्वच्छ होतील. भांड्यात उरलेले अन्न आधीच डस्टबिनमध्ये फेकून द्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT