Kitchen Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: पीलर आणि ग्रेटर सेट स्वच्छ करतांना कोणती काळजी घ्यावी

Kitchen Hacks: पीलर आणि ग्रेटर सेट ही अशी साधने आहेत जी स्वयंपाकघरात तुमचे काम सोपे करतात. हे देखील अशी साधने आहेत जी स्वच्छ करणे कठीण आहे. हे स्वच्छ करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

kitchen hacks best way clean peeler and grater

स्वयंपाकाच्या घाईत पिलरच्या मदतीने काम लवकर संपवम्यास मदत होते. ग्रेटर सेटचा वापर करून भाज्या आणि फळे तोडणे, सोलणे आणि किसणे खूप सोपे आहे. वारंवार वापरल्याने या वस्तु अस्वच्छ होतात.  नंतर त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. ते नीट स्वच्छ न केल्यास कालांतराने घाण आणि काळा थर त्यांच्या कडांना चिकटतो. स्वयंपाकघरातील इतर वस्तु प्रमाणेच त्यांची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे. 

लगेच स्वच्छ करावी

पिलरचा वापर झाल्यानंतर लगेच स्वच्छ केले पाहिजे. यामुळे त्यात कोणताही पदार्थ अडकून राहणार नाही.


ब्रश वापरा

बारीक छिद्रे किंवा खड्डे असलेल्या पिलरला ब्रशने स्वच्छ करावे. यासाठी तुम्ही लहान, मऊ ब्रिस्टल ब्रश किंवा जुना टूथब्रशचा वापर करू शकता. ब्लेड किंवा दातांवर हलक्या हाताने घासून घ्या. 

डिशवॉशरमध्ये धुताना काळजी घ्या

काही पीलर्स डिशवॉशर सुरक्षित असतात, याचा अर्थ ते डिशवॉशरच्या वरच्या रॅकमध्ये ठेवून स्वच्छ करता येते. तुमच्याकडे असलेली खवणी किंवा पीलर डिशवॉशरमध्ये ठेवता येईल का हे तुम्ही आधी तपासले पाहिजे.

लिंबाचा रस वापरावा

पिलर स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस वापरू शकता. यामुळे त्यातील दुर्गंधी निघुण जाते. यासाठी 1 कप पाण्यात 2-3 चमचे लिंबाचा रस घालून मिक्स करावे. त्यात पिलर 10 मिनिटे सोडा आणि नंतर ते मिश्रण साबण आणि स्क्रबने स्वच्छ करा. 

कोमट साबणाचे पाणी

पिलर स्वच्छ करताना कोमट साबणाच्या पाण्याचा वापर करावा. यासाठी तुम्ही साबण किंवा लिक्विड देखील वापरू शकता. २० मिनिट या पाण्यात पिलर ठेवल्यास स्वच्छ होईल.  

स्पंज वापरावा

पिलर स्वच्छ करताना स्पंज वापरू शकता. पिलर घासताना काळजी घ्यावी. जर तुमचा हात घसरला तर तुम्हाला ब्लेड लागू शकतो. 

कोरडे झाल्यानंतर वापरावे

पिलर नेहमी स्वच्छ आणि कोपडे झाल्यावरच पुन्हा वापरावे. त्यात ओलावा असल्यास जंगु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT