Kidney Problem Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kidney Care Tips: पावसाळ्यात किडनीचे इन्फेक्शन टाळायचे असेल तर करा 'हे' उपाय

पावसाळ्यात संसर्ग आणि किरकोळ आजारांचा धोका वाढला आहे. त्याचा किडनीवर देखील वाईट परिणाम होतो.

Puja Bonkile

Kidney Care Tips: पावसामुळे कडाक्याच्या उन्हापासून नक्कीच दिलासा मिळाला असला तरी या हंगामात लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत आहे. एवढेच नाही तर पावसाळ्यात संसर्ग आणि किरकोळ आजारांचा धोका वाढला आहे.

त्याचा किडनीवर खूप वाईट परिणाम होतो. त्याची वेळीच काळजी घेतली नाही तर किडनीशी संबंधित गंभीर आजार कधी तुमचा सोबती बनेल हे कळणारही नाही. 

  • पावसाळ्यात या आजारांचा वाढतो धोका

पावसाळ्यात बाहेरचे काहीही खाणे टाळावे. कारण जर तुम्ही चुकून घाणेरडे पाणी किंवा बाहेरचे पदार्थ खाल्यास किडनीला दुखापत होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या ऋतूत 'बॅक्टेरियल इन्फेक्शन लेप्टोस्पायरोसिस'चा धोका वाढतो. 

कारण त्यामुळे किडनी सहज खराब होते. तुम्हाला माहिती आहेच की पावसात डेंग्यू, टायफॉइड, डायरिया, हिपॅटायटीस ए आणि हिपॅटायटीस बी चा धोका जास्त असतो. कारण हे सर्व आजार आहेत ज्यामुळे किडनीचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

  • हे काम करावे

किडनी पूर्णपणे स्वच्छ ठेवायची असेल किंवा संसर्गापासून वाचवायची असेल, तर जास्तीत जास्त पाणी प्यावे. भरपूर पाणी किंवा रस प्या. पावसाळ्यात पाणी उकळून थंड झाल्यावर प्यावे. याशिवाय तुम्ही फळांचा रस, ताक तसेच इतर ज्यूस पिऊ शकता. 

  • पाण्यात पोहणे टाळावे

पावसाळ्यात थंड पाण्यात पोहणे टाळावे. तसेच, आपले हात वारंवार साबणाने धुवावे. डासांपासून बचाव करण्यासाठी ओडोमास लावावा.

  • पावसाळ्यात योग्य आहार घ्यावा

पावसाळ्यात योग्य आणि पोषक आहार घ्यावा. कारण जर तुम्ही हिरव्या भाजी करत असाल तर आणि ती थोडीशी कच्ची राहिली तर ती पोटात जाऊन इन्फेक्शन होऊ शकते. यामुळे पावसाळ्यात चांगले शिजलेलेच पदार्थ खावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT