Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घराच्या बाल्कनीत ठेवा तांब्याचा सूर्य, या 3 गोष्टी ठेवल्यानेही होईल धनप्राप्ती

गोमन्तक डिजिटल टीम

घरात सकारात्मक ऊर्जा येत रहावी तसेच, जीवनात समृद्धी येण्यासाठी वास्तुशास्त्रात (Vastushastra) अनेक प्रकारचे उपाय सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. त्यामुळे घरातील प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी तसेच योग्य दिशेला असणे महत्वाचे आहे. काही वस्तू बाल्कनीत ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आर्थिक संकट दूर होऊन कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते. चला तर मग, जाणून घेऊया घराच्या बाल्कनीमध्ये कोणत्या वस्तू ठेवणे शुभ मानले जाते.

तांब्याचा सूर्य

वास्तुशास्त्रानुसार तांब्याचा सूर्य, मंगळाशी संबंधित आहे. त्यामुळे घराच्या बाल्कनीत तांब्याचा सूर्य अवश्य ठेवावा. बाल्कनीच्या पूर्व दिशेला तांब्याचा सूर्य ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा तर नष्ट होऊन, आर्थिक समस्यांही सुटतात.

तुळशीचे रोपटं

हिंदू धर्मानुसार, तुळशीच्या रोपामध्ये धनाची देवी लक्ष्मी वास करते, त्यामुळे घराच्या बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप बाल्कनीच्या पूर्व दिशेला लावावे. यामुळे वास्तुदोष दूर होतात. तसेच पैशाची कमतरता दूर होऊन उत्पन्न वाढते.

मनी प्लांट

धार्मिक मान्यतेनुसार कुबेर देव उत्तर दिशेला राहतात, त्यामुळे मनी प्लांट देखील घराच्या बाल्कनीच्या उत्तर दिशेला लावावा. मनी प्लांट लावल्याने धनलाभ होण्याचे योग असतात अशी मान्यता आहे.

लाफिंग बुद्धा

लाफिंग बुद्धा सुद्धा घराच्या बाल्कनीत ठेवणे शुभ मानले जाते. त्यामुळे नात्यात गोडवा निर्माण होतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होते व सुख-समृद्धी राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT