money plant  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर येऊ शकते दारिद्रय

गोमन्तक डिजिटल टीम

वास्तुशास्त्रानुसार, घरात मनी प्लांट (Money Plant) लावण्याबाबत काही नियम आहेत, ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. मनी प्लांट अतंत्य शुभ मानले जाते. मनी प्लांट लक्ष्मी यांचा जवळचा संबंध आहे. म्हणूनच याला संपत्तीची वनस्पती देखील म्हणतात. मनी प्लांट घरात लावल्याने धन-संपत्ती वाढते.

मनी प्लांट घरी असल्यास घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. मनी प्लांट घरात लावताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

मनी प्लांट घरात लावताना खालील गोष्टी लक्षात ठेवा

मनी प्लांट कधीही घराबाहेर लावू नये. कारण ते पैशाशी संबंधित आहे. त्यामुळे बाहेरच्या लोकांनी ते पाहणे अशुभ आहे.

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट ईशान्य दिशेला अजिबात लावू नये. कारण ही दिशा गुरू ला दर्शवते आणि ती शुक्राच्या विरुद्ध आहे. या दिशेला लावल्यास सुख-समृद्धी संपते अशी मान्यता आहे.

वास्तूनुसार मनी प्लांट पूर्व किंवा पश्चिम दिशेला लावू नये. त्यामुळे व्यक्तीला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

मनी प्लांट नेहमी आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोनात ठेवावे. कारण ही दिशा शुक्र ग्रहाद्वारे दर्शविली जाते आणि श्री गणेशाची दिशा आहे.

वास्तुशास्त्रानुसार रात्री मनी प्लांटला हात लावू नये किंवा पाणी घालू नये.

जर मनी प्लांटची पाने पिवळी असतील तर ती ताबडतोब काढून टाकावीत. कारण त्यामुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीवर त्याचा वाईट परिणाम होतो.

मनी प्लांट नेहमी खरेदी करूनच लावावे. ते कधीही दुसऱ्याच्या घरून घेऊ नये.

मनी प्लांट कोणालाही देऊ नये. यामुळे तुमच्या घरातील सुख, समृद्धी आणि संपत्ती त्या व्यक्तीसोबत जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT