Karwa Chauth 2023: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Karwa Chauth 2023: करवा चौथचा उपवास करताय? मग जाणून घ्या काय खावे अन् काय नाही...

करवा चौथचा उपवास करण्यापुर्वी काय खावे आणि खावे नाही हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Karwa Chauth 2023: करवा चौथ उपवास महिलांसाठी खूप खास असतो.  यासाठी महिलां काही दिवस आधीच तयारीला सुरूवात करतात. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी  दिवसभर निर्जला उपवास करतात. या दरम्यान काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेऊया.

उपवास करताना आरोग्याची काळजी घ्यावी

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, करवा चौथच्या उपवासात आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. यासाठी एक दिवस अगोदर खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यायला सुरुवात करावी. करवा चौथची सुरुवात सरगी नावाच्या कार्यक्रमाने होते. यामध्ये उपवास करणाऱ्या महिलां उपवासाच्या आधी काही खास अन्न सेवन करतात. अशावेळी करवा चौथ व्रताच्या एक दिवस आधी आणि सर्गीच्या वेळी अशा पदार्थांचे सेवन करावे जे तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवू शकतात.

 उपवास कोण करू शकतो?

तज्ज्ञांच्या मते, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा अनेक आरोग्य समस्या आहेत ज्यामुळे तुम्ही जास्त वेळ रिकाम्या पोटी राहिल्यास हानी होऊ शकते. याशिवाय करवा चौथचा उपवास करण्यापूर्वी आहाराची काळजी घ्यावी. जेणेकरून तुमचे आरोग्य दिवसभर चांगले राहते आणि तुमची ऊर्जा टिकून राहते. 

  • काय खावे

उपवासा दरम्यान आपल्या आहारात फळांचा समावेश करावा. शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण योग्य राखण्यासाठी त्यानुसार आहार घ्यावा.

रताळे आणि गूळ यांसारख्या गोष्टींचे सेवन करावे. यामुळे शरीरात कार्बोहायड्रेट्सची कमतरता भासत नाही आणि त्याची एनर्जी टिकून राहते.

उपवास करण्यापूर्वी हायड्रेशनची देखील काळजी घेतली पाहिजे. यासाठी नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. याने शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्व सहज मिळतात.

  •  काय खाऊ नये

करवा चौथ उपवासापुर्वी चहा आणि कॉफी घेणे टाळावे. हे प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकते.

मसालेदार किंवा तळलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका. यामुळे पोट फुगणे आणि गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात. 

चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

SCROLL FOR NEXT