Tulsi Vivah 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kartik Purnima 2023: कार्तिक पौर्णिमेला तुळशीची पूजा केल्याने लाभेल सुख-शांती

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

Puja Bonkile

Kartik Purnima 2023: कार्तिक पौर्णिमा हा हिंदू धर्मात अत्यंत शुभ दिवस मानला जातो. ज्या भक्तांना भगवंताशी आपली भक्ती दृढ ठेवायची आहे त्यांच्यासाठी हा सण खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतात. या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी उपाय केले जातात. या दिवशी केलेल्या विशेष उपायांमध्ये तुळशीची पूजा करणे विशेष मानले जाते.

या दिवशी तुळशीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते आणि तुळशीची पानेही भगवान विष्णूला अर्पण केली जातात. असे मानले जाते की जो कोणी या दिवशी तुळशीची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला भगवान विष्णूची कृपा देखील प्राप्त होते.

तुळशीचे अनेक प्रकार असले तरी पूजेत तुळशीच्या काही खास प्रकारांचाच समावेश केला जातो. जेव्हा कार्तिक पौर्णिमा येते तेव्हा ज्योतिषी डॉ. आरती दहिया जी यांच्याकडून जाणून घेऊया की या दिवशी कोणत्या तुळशीची पूजा करणे तुमच्यासाठी फलदायी ठरू शकते. 

  • तुळशीच्या रोपाचे महत्व

तुळशीला हिंदू धर्मात सर्वात पवित्र वनस्पतींपैकी एक मानले जाते. हे रोप घरामध्ये लावणे खूप शुभ असते. तुळशीची नियमितपणे पूजा केल्याने समृद्धी मिळते. असे मानले जाते की जर तुम्ही ही वनस्पती तुमच्या घरामध्ये योग्य ठिकाणी लावली आणि त्याची नियमित पूजा केली तर ते सर्व नकारात्मक ऊर्जा निघुण जाते.

असे मानले जाते की तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी निवास करते आणि म्हणूनच तिला विष्णूप्रिया देखील मानले जाते. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो.  

  • कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा का केली जाते? 

संपूर्ण कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित मानला जातो. या संपूर्ण महिन्यात तुळशीची पूजा केल्यास विशेष फळ मिळते. एवढेच नाही तर कार्तिक महिन्यात नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करून या दिवशी तुळशीसमोर दिवा लावल्यास संपूर्ण कार्तिक महिन्यात नित्यनेमाने दिवा लावल्यासारखे फळ मिळते. या कारणास्तव वास्तुशास्त्रात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करण्याचा आणि तुळशीला जल अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो. 

  • कोणत्या तुळशीची पुजा करावी?

तुळशीचे अनेक प्रकार असले तरी त्यापैकी दोन प्रकारच्या तुळशी पूजेसाठी शुभ मानल्या जातात. राम आणि श्याम या दोन्ही प्रकारच्या तुळशीचे वास्तुशास्त्रात स्वतःचे महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही यापैकी कोणत्याही तुळशीची पूजा करू शकता.

राम तुळशीची पाने हिरवी आणि श्यामाची पाने जांभळी असतात. तुळशीचे कोणतेही रोप तुम्ही पूजेत वापरू शकता. पण जर तुम्ही घरात तुळशीचे रोप लावत असाल तर लक्षात ठेवा की यापैकी एकच तुळशीचे रोप घरात ठेवावे. यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी कायम राहते. 

  • कोणत्या तुळशीची पूजा करू नये? 

जर तुम्ही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करत असाल तर लक्षात ठेवा की ज्या झाडाची पाने कोरडी आहेत अशा तुळशीच्या रोपाची पूजा कधीही करू नका. हिरव्या तुळशीचीच पूजा करणे शुभ मानले जाते.  

नेहमी तुमच्या घराच्या अंगणात फक्त तुळशीच्या रोपाची पूजा करावी. योग्य ठिकाणी न लावलेल्या तुळशीची पूजा कधीही करू नका. 

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राम आणि श्यामा तुळशीशिवाय इतर कोणत्याही तुळशीची पूजा करू नये. 

  • तुळशीची पुजा कशी करावी

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करण्यासाठी सर्वात पहिले तुळशीचे भांडे पूर्णपणे स्वच्छ करून त्या भांड्यात केशर किंवा हळदीची पेस्ट लावावी. 

तुळशीला लाल ओढणी, बांगड्या, बिंदी इत्यादी शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्या. 

तुळशीची पूजा करून आरती करावी. 

तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा आणि पूजा करून 7 वेळा प्रदक्षिणा घालाव्या. 

पूजा आटोपल्यानंतर तुळशीला प्रसाद अर्पण करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT