Kamda Ekadashi 2023 Date: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kamda Ekadashi 2023: आज कामदा एकादशी! जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् उपाय

कामदा एकादशीला भगवान विष्णूचे सर्वोत्तम व्रत म्हटले जाते.

दैनिक गोमन्तक

Kamda Ekadashi 2023: सनातन धर्मात प्रत्येक एकादशीला खास महत्त्व आहे. एकादशी व्रताची मुख्य देवता म्हणजे भगवान विष्णू, कृष्ण किंवा त्यांचे अवतार ज्यांची या दिवशी पूजा केली जाते. 

चैत्र महिन्यातील एकादशी व्रताचे विशेष महत्त्व असून त्यामुळे मन आणि शरीर दोन्ही संतुलित राहतात. यापैकी एक म्हणजे कामदा एकादशी. 

असे म्हटले जाते की या दिवशी व्रत केल्याने सर्व दु:ख दूर होतात. यासोबतच कामदा एकादशीचे व्रत आणि पूजा केल्याने भगवान विष्णू व्यक्तीच्या जीवनातील सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करतात. 

यामुळेच या एकादशीचे एक नाव फलदा एकादशी देखील आहे. यावेळी कामदा एकादशीचे व्रत 01 एप्रिल म्हणजेच आज पाळले जात आहे. 

  • कामदा एकादशी शुभ मुहूर्त

शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कामदा एकादशी व्रत केले जाते. कामदा एकादशी 01 एप्रिल रोजी म्हणजेच आज रात्री 01:58 वाजता सुरू झाली आहे आणि 02 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या पहाटे 04:19 वाजता समाप्त होईल. 

उदयतिथीनुसार कामदा एकादशी 01 एप्रिललाच साजरी केली जाईल. कामदा एकादशीचे पारण 02 एप्रिल रोजी दुपारी 01:40 ते संध्याकाळी 04:10 पर्यंत असेल. 

  • कामदा एकादशीची पूजा पद्धत

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून प्रथम सूर्याला अर्घ्य द्यावे. 

यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी. 

त्यांना पिवळी फुले, पंचामृत आणि तुळशीची पाने अर्पण करावी. 

फळे अर्पण करावी.

यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करा आणि त्यांच्या मंत्रांचा जप करावे. 

या दिवशी फलाहार करावा.

जर तुम्ही फक्त एका वेळासाठी उपवास करत असाल तर दुसऱ्या वेळेत वैष्णव भोजन घ्यावे. 

दुसऱ्या दिवशी सकाळी एका वेळचे अन्न किंवा धान्य एखाद्या गरीबाला दान करावे. या दिवशी देवाचे ध्यान करावे.

कामदा एकादशी उपया

1. जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसमोर हळदीच्या दोन गाठी अर्पण करा. असे केल्याने तुमची समस्या लवकर दूर होईल. 

2. कामदा एकादशीच्या दिवशी गरजू लोकांना हरभरा डाळ आणि मिठाई दान करा. असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद येईल. 

3. जर तुम्हाला जीवनात प्रगती करायची असेल तर कामदा एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा 108 वेळा स्पष्ट जप करा. 

4. भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशीच्या पूजेमध्ये भगवान विष्णूला पिवळ्या झेंडूचे फूल अर्पण करा. 

5. कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरात मोराचे पंख किंवा मुकुट अर्पण करा. असे केल्याने तुमचे दु:ख दूर होतील आणि तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल. 

  • पाप नष्ट करण्यासाठी हे उपाय करावे

भगवान श्रीकृष्णाला चंदनाची माळ अर्पण करावी. यानंतर "क्लीन कृष्ण क्लीन" च्या 11 फेऱ्या कराव्या. अर्पण केलेली चंदनाची माळ आपल्याजवळ ठेवावी. पापांचे प्रायश्चित्त होईल, पापी प्रवृत्तीपासून मुक्ती मिळेल. तुमची कीर्ती वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT