गोव्यात ‘जॉली जम्बोटी’ चित्र प्रदर्शन होणार सुरु

 

Dainik Gomantak

लाइफस्टाइल

गोव्यात ‘जॉली जम्बोटी’ चित्र प्रदर्शन होणार सुरु

हे प्रदर्शन 2 जानेवारीपर्यंत रसिकांसाठी खुले असेल

दैनिक गोमन्तक

‘क्रिएटिव्ह स्पार्क’तर्फे ‘जॉली जम्बोटी’ हे चित्र प्रदर्शन वागातोर येथील उज्वल आर्ट गॅलरीत सुरू आहे. पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, मध्य प्रदेश व गोवा (Goa) या राज्यातील आठ युवा प्रतिभेच्या चित्रकारांच्या, विविध माध्यमातून व शैलीतून निर्माण झालेल्या चित्रकृतींचा या प्रदर्शनात समावेश आहे. हे प्रदर्शन 2 जानेवारीपर्यंत रसिकांसाठी खुले असेल

बावीस वर्षांची मृत्तिका विश्वास कॅलिग्राफी (अक्षरकला) मध्ये कुशल आहे. ग्रिंडेलिया भट्टाचार्य या स्वयंशिक्षित चित्रकार आहेत. झोपडपट्टीतील मुले व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी त्या कार्य करतात. टेलिग्राफ, फेमिना यासारख्या मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या चित्रांमधून त्यांच्या सर्व अंगभूत प्रतिभेचा आविष्कार घडतो. नयना शेणवी पटेल यांनी (मध्यप्रदेश) एमबीए पदवी मिळवली आहे व त्या उद्योग व्यवसायात आहेत परंतु चित्रकला (Painting) हा त्यांचा आवडीचा विषय आहे. निसर्गातील (Nature) व जीवनातील साधेपणा त्यांना कॅनवासवर उतरवावा असे वाटते आणि त्या उर्मीतूनच त्या चित्रे (Pictures) रेखाटतात. त्यांच्या चित्रकृतींमधून त्या सामाजिक संदेशही देतात. गोवा (Goa) स्थित नेहा राणी यांचा निसर्गाचा ध्यास त्यांच्या चित्रात उतरलेला दिसतो. निसर्ग आपल्या घराच्या खिडकीपर्यंत आणण्याचा त्यांचा प्रयत्न चित्रांच्या माध्यमातून जाणवतो. साईकत

चटोपाध्याय यांचा कल धार्मिक व अध्यात्मिक चित्रांकडे आहे. त्यांच्यावर बुद्धिझमचा प्रभाव आहे. बोधिसत्व त्यांना भावतात व त्यांच्या चित्रकलेतून आकार घेतात. शदाब खान यांचे सायकेडेलिक शैलीवर प्रभुत्व आहे. किंबल चौधरी ही छत्तीसगडची युवा चित्रकार (Painter) अमूर्त शैलीत आपल्या सर्जनशीलतेला अभिव्यक्त करते. एम एफ हुसेन यांच्याकडून तिने प्रेरणा घेऊन स्वतःची अंगभूत शैली विकसित केली आहे. सामाजिक उपक्रमातही तिचा वावर चालू असतो. नाविन्यपूर्ण कल्पनांनी तिने आपल्या चित्रांना वेगळा आयाम दिला आहे. स्नेहा भौमिक ह्या पुराणकालीन व जुन्या पारंपरिक कला-कौशल्याला (Art) स्वतःच्या प्रतिभेची जोड देऊन चित्रकृती साकारतात. नकारात्मकता, मनातील भीती, ताण-तणाव यापासून मुक्तीचा मार्ग त्यांच्या आपल्या चित्रांमधून (Picture) दर्शवतात.

- नितीन कोरगावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नोंदणी न केलेले होम स्टे, हॉटेल्सवर कारवाई अटळ! सरकारी महसूल बुडविणाऱ्यांची गय नाहीच, पर्यटनमंत्र्यांचा थेट इशारा

Horoscope 28 Saptember 2026: करिअरला मिळणार गती, वैवाहिक जीवनात गोडवा वाढणार! आज 'या' राशींच्या नक्षत्रात चमकणार यशाचा तारा

History: सदाशिवगड ताम्रपट अन् गोव्यातील कदंब

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

SCROLL FOR NEXT