Jamun For Diabetes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Jamun For Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतील जांभळाच्या बिया

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी जांभळाच्या बिया उत्तम उपाय आहेत. जाणून घ्या त्यांचा वापर कसा करायचा.

दैनिक गोमन्तक

Jamun For Diabetes: मधुमेहाचा हा आजार सामान्य झाला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच त्याला बळी पडत आहेत. दुर्दैवाने मधुमेहावर कोणताही उपाय नाही. योग्य आहार आणि नियमित योगा केल्याने यावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते, त्यामुळे रुग्णाला अनेक लक्षणे आणि समस्या जाणवू लागतात.

पण जांभुळ हे एक फळ आहे, जे मधुमेह, जुलाब, जळजळ, पचनाच्या समस्या सुधारण्यास मदत करते. तसेच खोकला आणि सर्दी, आतड्यांतील कृमी, दमा, घसादुखी अशा अनेक आजारांवर औषध म्हणून काम करते. विशेष म्हणजे जांभळाचे फळ जितके चविष्ट आणि शक्तिशाली आहे तितकेच त्याच्या बिया आरोग्याचा खजिना देखील आहेत.

Jamun
  • आयुर्वेदिक औषध म्हणून वापर

जांभळाच्या बिया मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी उत्तम आहे असे असे डॉक्टर सांगतात. आयुर्वेदात जांभळाला खुप महत्व आहे. जर तुम्हालाही मधुमेह असेल तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जांभलाचे सेवन करावे.

  • जाभंळाच्या बिया चावून सेवन करावे

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी जांभळाच्या बियांचा वापर अनेक प्रकारे करता येतो. पहिला उपाय म्हणजे दिवसातून एकदा जांभळाच्या बिया चावून खाव्यात.

  • जांभळाच्या बीयांची पावडर

जांभळाच्या बिया उन्हात भिजवून, बिया बारीक करून पावडर बनवावी.या पावडरचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. जांभळाच्या बियांची पावडर ५ ग्रॅम कोमट पाण्यासोबत दिवसातून २ वेळा घ्यावी.

  • या गोष्टी ठेवा लक्षात

मधुमेह असणाऱ्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर जांभुळ खाणे टाळावे. डॉक्टरांच्या मते, जांभुळ खाल्यास ही समस्या अधिक वाढू शकते.

  • जांभूळ खातांना घ्या अशी काळजी

जांभळाचे सेवन केल्याने वजन कमी नियंत्रणात राहते. त्याचप्रमाणे जांभूळमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडेंटमुळे ते खाणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते, जांभूळ दिवसाच्या कोणत्याही वेळी खाऊ शकतो. परंतु रिकाम्या पोटी खाऊ नका. अन्न खाल्ल्यानंतर जांभळाचे सेवन करणे योग्य राहील. हे चयापचय वाढवेल आणि पचनास देखील मदत करेल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT