Jaggery Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Jaggery Benefits: जेवणानंतर गूळ खाण्याने शरीराला होतात 'हे' फायदे; तुमचे वजनही राहते नियंत्रणात

गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने पचनक्रिया मजबूत होते.

दैनिक गोमन्तक

Jaggery Benefits: आपल्या देशात गुळाचे खूप महत्त्व आहे. त्याला नैसर्गिक गोड म्हणून वापरले जाते. अजूनही अनेकी ठिकाणी वडीलधारी माणसे दिवसाची सुरुवात गूळ आणि पाण्याने करतात. गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने पचनक्रिया मजबूत होते.

यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. गुळामध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शियम आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. जेवण झाल्यावर गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. जेवणानंतर गूळ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

पचनक्रिया मजबूत करते

पचनासाठी गूळ खूप फायदेशीर आहे. प्रत्येक जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते. यामुळे गॅस, पोट फुगणे, अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

जेवणानंतर गूळ खाल्ल्याने ऊर्जा वाढते. याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. जेवणानंतर गूळ खाल्ल्याने अशक्तपणाची समस्या कमी होते.

हाडे मजबूत होतात

जेवणानंतर गूळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादी अनेक प्रकारचे पोषक घटक गुळात पुरेशा प्रमाणात आढळतात. जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात.

वजन कमी करते

गुळाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पचनास मदत होते. त्यामुळे लोकांना वजन कमी करण्यास मदत होते.

अॅनिमियामध्ये फायदेशीर

गुळाचे नियमित सेवन केल्याने अॅनिमियाचा त्रास होत नाही. अॅनिमियाच्या रुग्णांसाठी गुळाचे सेवन खूप फायदेशीर आहे. गुळामध्ये लोह आणि फॉस्फरस असते ज्यामुळे शरीरातील रक्त वाढते. ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी गुळाचे सेवन अवश्य करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

SCROLL FOR NEXT