International No Diet Day Dainik Gomantak
लाइफस्टाइल

International No Diet Day: डाएटिंग केल्याने होउ शकतात 'हे' आजार

जर तुम्हीही बारीक होण्यासाठी डाएटिंग करत असाल तर या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

International No Diet Day: सध्याच्या धावपळीच्या काळात अवेळी जेवण आणि योगाचा अभाव असल्याने अनेकांना वजन वाढीच्या समस्या निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून लोक वजन कमी करण्यासाठी डाएटिंगसारख्या गोष्टींचा वापर करतात.

वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी अनेक लोकांसाठी डाएटिंग ही एक सामान्य पद्धत बनली आहे. परंतु त्याचे शरीरावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. डाएटिंगमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागु शकते.

  • पोटाच्या समस्या

कमी खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि पचनसंस्था कमजोर होते. जे लोक डाएटिंग करतात त्यांच्या शरीरात फायबरची कमतरता जाणावते, जी तुम्हाला अनेक प्रकारच्या पदार्थांतुन मिळते. डाएटिंगमुळे शरीराला आवश्यक घटक मिळत नाहीत. त्यामुळे पोटाशीसंबंधित समस्या निर्माण होतात.

  • स्टोनची समस्या वाढु शकते

जे लोक कमी खातात किंवा डाएटिंग करतात, त्यांच्या शरीराला कमी कॅलरीज मिळतात. असे नियमित केल्यास पित्ताशयात खडे होण्याचा धोकाही वाढतो.

  • अशक्तपणा जाणवु शकतो

जेव्हा तुम्ही पुरेसे अन्न खात नाही आणि उपाशी राहता तेव्हा शरीराला ऊर्जा मिळत. यामुळे अशक्तपणा जाणावतो. डाएटिंग करणाऱ्या बहुतांश लोकांच्या स्वभावात चिडचिडेपणा येतो.

  • मेटाबोलिज्म कमकुवत होतो

कमी खाल्ल्याने मेटाबोलिज्मवरही परिणाम होतो. जे लोक डाएटिंग करतात किंवा जेवण वगळतात, त्यांचे वजन अनेकदा कमी होण्याऐवजी उलट त्यांचे वजन वाढू लागते. याचे कारण तुमचे मेटाबोलिज्म आहे. डाएटिंग करताना स्नायूंमध्ये सैलपणा येतो आणि शरीराचा आकार बिघडू शकतो.

  • 'इंटरनॅशनल नो डाएट डे' साजरा करण्यामागचे कारण

या दिवशी लोकांना त्यांचे वाढते वजन, लठ्ठपणा इत्यादी विसरून दिवसभर त्यांच्या आवडीचे पदार्थ खाण्यास प्रोत्साहित केले जाते. लोकांना आपल्या शरीराला प्रेम करण्याची आणी जसे आहोत तसे स्वीकीरण्याची प्रेरणा मिळते. आजकाल लोक अति प्रमाणात डाएटिंग करू लागले आहेत ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 

अनेक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अति डाएटिंगमुळे तुम्हाला कमी रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजार, टाइप-2 मधुमेह इत्यादी आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे अति डाएटिंग करणे देखील आरोग्यासाठी धाकादायक ठरु शकते.

  • हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास

हा दिवस 1992 साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला. मेरी इव्हान्स या ब्रिटीश महिलेने (Women) सर्वप्रथम हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. मेरी इव्हान्सने लोकांना हे पटवून द्यायला सुरुवात केली की जास्त डाएटिंगमुळे त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. 

हा दिवस साजरा करण्यासाठी मेरीने तिच्या काही नातेवाईक आणि मित्रांना घरगुती पार्टीसाठी आमंत्रित केले. तेव्हापासून दरवर्षी 6 मे रोजी लोक 'इंटरनॅशनल नो डाएट डे' साजरा करतात. हा दिवस साजरा करण्यासाठी, घरी पार्टी आयोजित करा आणि कोणत्याही बंधनाशिवाय आपल्या आवडीचे पदार्थ खा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT