National Handloom Day 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

National Handloom Day 2022 : 'हातमाग' हा भारताचा वारसा; जाणून घ्या कशी झाली राष्ट्रीय हातमाग दिवसाची सुरुवात

भारतात अनेक वर्षांपासून विविध कला जपल्या जातात. त्यापैकीच एक कला म्हणजे हातमाग. राष्ट्रीय हातमाग दिवस 2022 दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

भारतात अनेक वर्षांपासून विविध कला जपल्या जातात. त्यापैकीच एक कला म्हणजे हातमाग. राष्ट्रीय हातमाग दिवस 2022 दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी भारतीय स्थानिक हातमागांना प्रोत्साहन दिले जाते. भारतीय ब्रँड आणि खादी जगासमोर नेण्यासाठी पुढाकार घेतला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हातमाग उद्योगाला आर्थिकदृष्ट्या बळकट करून जगासमोर एक ब्रँड म्हणून सादर करणे हा आहे.

खादीची साडी, सूट, दुपट्टा किंवा हातमागापासून बनवलेला कुर्ता आणि शर्ट हे अगदी आरामदायी आहेत आणि आजही अनेकांची पहिली पसंती आहेत. आपल्या देशातील स्थानिक हातमाग कामगारांच्या कामाचे कौतुक आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

(National Handloom Day 2022)

हातमागाचा इतिहास

1905 साली लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीची घोषणा केली, त्यानंतर या दिवशी कोलकात्याच्या टाऊन हॉलमधील जाहीर सभेतून स्वदेशी चळवळीला सुरुवात झाली. भारत सरकारच्या स्मरणार्थ दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. 7 ऑगस्ट 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी चेन्नईतील मद्रास कॉलेजच्या शताब्दी कॉरिडॉरवर दिवसाची सुरुवात करून विणकरांना पुढे नेण्याची घोषणा केली. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. 7 ऑगस्ट 2022 म्हणजेच 8 वा हातमाग दिन आज साजरा केला जात आहे.

हातमाग हा भारताचा वारसा

हातमाग हा भारताचा वारसा आहे, त्यामुळे त्याचे महत्त्वही मोठे आहे. आंध्र प्रदेशची कलमकारी, गुजरातची बांधणी, तामिळनाडूची कांजीवरम आणि महाराष्ट्राची पैठणी या हातमागाच्या सहाय्याने बनवलेल्या काही हातमाग कलेचे प्रकार आहेत. यासाठी प्रचंड सातत्य आणि वेळ लागतो. यामुळेच हातमाग उद्योग हा भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक आवश्यक भाग मानला जातो. हे मोठ्या संख्येने लोकांसाठी रोजगाराचे साधन देखील आहे. या क्षेत्रात केवळ 70 टक्के महिला काम करतात.

हातमागाच्या ट्रेंडला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याला एक ब्रँड बनवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पुढे आले आहेत. अनेक अभिनेत्री हातमागापासून बनवलेल्या कपडे, साड्या घालून याचे प्रमोशन करताना दिसतात.

2015 मध्ये हा दिवस पहिल्यांदा सुरू झाला तेव्हा तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी सोशल मीडियावर 'आय वेअर हँडलूम' मोहीम सुरू केली होती. हातमागाचे कपडे लोकप्रिय करणे आणि विणकाम करणाऱ्या समाजाला मदत करणे हा त्यामागचा उद्देश होता. यानंतर हातमाग संदर्भात अनेक प्रकारच्या मोहिमा राबविण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT