World Diabetes Day 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diabetes Biobank: भारतात बनली पहिली डायबिटीज बायोबँक; जाणून घ्या, ती कुठे आहे अन् शुगर नियंत्रणात कशी करेल मदत?

India’s First Diabetes Biobank In Chennai: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन (MDRF) यांनी मिळून भारतातील पहिली डायबिटीज बायोबँक तयार केली आहे, जी चेन्नई येथे आहे.

Manish Jadhav

भारतात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत केवळ वयस्कर लोकच डायबिटीजला बळी पडत होते, मात्र आता तरुणांनाही या आजाराचा सर्वाधिक फटका बसत आहे.

बिघडलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे तरुणांमध्ये डायबिटीजचा धोका वाढत आहे.

हे लक्षात घेऊन, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन (MDRF) यांनी मिळून भारतातील पहिली डायबिटीज बायोबँक तयार केली आहे, जी चेन्नई येथे आहे.

डायबिटीजवर अधिकाधिक संशोधन करणे आणि या आजारावर योग्य उपचार शोधणे हा या बायोबँकचा उद्देश आहे. चला तर मग या बायोबँकबद्दल जाणून घेऊया...

डायबिटीज बायोबँकचा उद्देश काय?

दरम्यान, या बायोबँकचा उद्देश डायबिटीजची (Diabetes) कारणे जाणून घेणे आणि त्यावर उच्च तंत्रज्ञान संशोधनाद्वारे उपचार करणे हा आहे. डायबिटीजबाबत येथे सर्व प्रकारचे संशोधन केले जाईल. त्यामुळे डायबिटीजवरील उपचार सोपे होऊ शकतात. MDRF चे अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन यांनी सांगितले की, बायोबँक नवीन बायोमार्कर ओळखण्यात मदत करेल ज्यामुळे डायबिटीज त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला जाईल आणि उपचार सुधारेल. तसेच, ही बायोबँक भविष्यातील संशोधनासाठी आवश्यक डेटा प्रदान करेल.

फायदे

बायोबँक तयार केल्याने डायबिटीज नियंत्रित करण्यात आणि योग्य उपचारांवर संशोधन करण्यात मदत होईल. त्यामुळे डायबिटीजविरुद्ध जगाच्या लढाईत भारताची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. या बायोबँकच्या माध्यमातून भारत (India) इतर देशांनाही मदत करु शकतो आणि आपल्या मित्र देशांकडूनही मदत घेऊ शकतो. ही रिपॉजिटरी हाय-टेक सॅम्पल स्टोरेज आणि डेटा शेअरिंग तंत्रज्ञान वापरुन स्वस्त आणि प्रभावी उपचार शोधण्यात मदत करेल.

डायबिटीज बायोबँक अभ्यास काय सांगतो?

डायबेटिस बायोबँकचा पहिला अभ्यास ICMR-INDIAB आहे, ज्यामध्ये 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 1.2 लाखांहून अधिक लोकांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील डायबिटीज आणि डायबिटीजपूर्व रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

डायबिटीज हा भारतासाठी महामारीसारखा आहे, 10 कोटींहून अधिक लोकांना प्रभावित करते. बहुतेक विकसित राज्यांमध्ये डायबिटीजच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ICMR-YDR अभ्यासानुसार, ही अशा प्रकारची पहिली राष्ट्रीय नोंदणी आहे, जी डायबिटीजवर लक्ष केंद्रित करते आणि खूप लवकर सुरु झाली.

दुसऱ्या अभ्यासात तरुणांमध्ये डायबिटीजच्या घटनांवर लक्ष ठेवले गेले. या अभ्यासात देशभरातील 5,500 हून अधिक लोकांचा समावेश करण्यात आला होता. तरुणांमध्ये टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीजचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. अशा परिस्थितीत देशातील तरुणांना या धोकादायक आणि असाध्य आजारापासून वाचवण्यासाठी डायबिटीज बायोबँकची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT