Car Care Tips: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Car Care Tips: तुमच्या कारची घ्या अशी काळजी

दैनिक गोमन्तक

Car Care Tips: आजकाल देशातील आणि जगाच्या हवामानाचे स्वरूप बदलत आहे. याचा अंदाज बांधणेही खूप कठीण झाले आहे. यामध्ये माणसांसोबत वाहनांनाही नुकसान होत आहे. या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही पढिल उपाय करु शकता.

  • सुरक्षित ठिकाणी पार्क करा

तुम्ही घरी असल्यास, घर किंवा गॅरेजसारख्या सुरक्षित आणि बंद ठिकाणी कार पार्क करा. जेणेकरुन गाडी थेट वादळाच्या संपर्कात येण्यापासून किंवा बाहेर कुठेतरी येण्यापासून टाळू शकेल, तर झाडे, वीजवाहिन्या आणि खांब आणि कमकुवत घरे किंवा झोपड्यांसारख्या ठिकाणी उभे राहणे टाळावे. अशा वेळी ते पडण्याची शक्यता जास्त असते.

  • हैजर्ड लाइट्स वापरावे

जर तुम्ही गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली असेल, तर तुम्ही धोक्याचे दिवे चालू करावेत जेणेकरून त्या मार्गाने जाणारी इतर वाहने ती पाहू शकतील. कारण अशा हवामानात दृश्यमानता कमी होते. ज्यामुळे कोणत्याही प्रकारची टक्कर होण्याची शक्यता वाढते.

  • पुर येतील अशा ठिकांपासून राहा दुर

मुसळधार पावसात अशा ठिकाणी वाहन पार्क करणे टाळावे. जेथे पाणी तुंबण्याची शक्यता असते. जसे की कमी जागा किंवा अंडर पास यासारख्या ठिकांपासून दुर राहावे.

  • सनरूफ, दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा

वादळी हवामानापूर्वी आपली कार पूर्णपणे तपासुन घ्यावी. कुठे सनरूफ, खिडक्या, दरवाजे वगैरे बंद करावे. उघडे असल्यास पाणी आत जाऊन मोठे नुकसान होण्याची शक्यता वाढते.

  • कव्हर वापरणे आवश्यक

जर तुमच्याकडे कार पार्क करण्यासाठी कव्हर केलेले पार्किंग नसेल, तर तुम्ही तुमची कार कव्हरने झाकून ती चांगली बांधली पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT