Palmistry  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Palmistry: तळहातावर सूर्य रेषेचे महत्त्व! काय फायदे, काय तोटे जाणून घ्या

गोमन्तक डिजिटल टीम

मानवी तळहातावर अनेक रेषा असतात. या रेषा माणसाच्या आयुष्याबद्दल बरंच काही सांगून जातात, पण जेव्हा आनंद आणि यशाचा विचार येतो तेव्हा फक्त मेंदू आणि नशिबाची रेषा दिसते. तळहातावर (Palm) या दोन्ही रेषा मजबूत असतील तर व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते. दुसरीकडे, या दोन रेषा मजबूत असल्या तरीही, जर तुम्हाला प्रसिद्धी आणि ऐश्वर्य मिळत नसेल, तर तुम्ही एकदा तुमची सूर्यरेषा एखाद्या ज्योतिषाला (Astrologer) दाखवायला हवी. हस्तरेषा शास्त्रानुसार, (Palmistry) सूर्य रेषाच ठरवते की माणसाला आयुष्यात किती आनंद आणि यश मिळणार आहे. तळहातावर सूर्य रेषा स्पष्ट असेल तर खूप शुभ मानले जाते. त्याचबरोबर ही रेषा तुटल्याने जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.

अनामिका बोटाच्या खाली असलेल्या भागाला सूर्य पर्वत म्हणतात. तळहातावर, अनामिका बोटाच्या असलेल्या रेषेला सूर्य रेषा म्हणतात. सूर्य रेषे सोबत मस्तक रेषा असेल तर, अशी लोकं खूप भाग्यवान असतात असे मानले जाते. अशी लोकांना खूप पैसा मिळतो आणि ती अधिक नशीबवान असतात असे मानले जाते. हस्तरेषा शास्त्रानुसार तळहातातील सूर्य रेषा लांब, सरळ आणि स्पष्ट असेल तर त्या व्यक्तीला जीवनात खूप प्रसिद्धी आणि यश मिळते. असे मानले जाते की अशा व्यक्तीला जीवनातील सर्व सुख प्राप्ती होते. त्याची लोकप्रियता वाढते आणि जे काम करतात त्यात यशस्वी होतात.

सूर्य रेषा शुक्र पर्वतावरुन सुरू होऊन सुर्य पर्वतावर येऊन थांबत असेल तर अशी लोकं अधिक भाग्यशाली असतात. अशा लोकांचे नशीब लग्नानंतर उघडते असे मानले जाते. सूर्य रेषेवर तारा तयार होत असेल तर ती व्यक्ती कलाकार बनून आपल्या कलेतून देश आणि जगात नाव कमावते. हस्तरेषा शास्त्रानुसार अशा व्यक्तीला अपार संपत्ती आणि वैभव प्राप्त होते. तसेच, सूर्य रेषेवर बेटाचे चिन्ह असल्यास व्यक्तीला कामात मोठे नुकसान होते. असे लोक व्यावसायिक असतील तर त्यांची दिवाळखोरी होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT