Growth Hormone Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Growth Hormone: ग्रोथ हार्मोन्स नेमके काय करते? त्यांच्या कमतरतेमुळे होऊ शकतात गंभीर आजार; संपूर्ण माहिती जाणून घ्या

Growth Hormone Importance: मुलांचा शारीरिक विकास ग्रोथ हार्मोन (GH) वर अवलंबून असतो. हे हार्मोन्स मोठ्या लोकांसाठीही तेवढेच महत्वाचे असते.

Manish Jadhav

मुलांचा शारीरिक विकास ग्रोथ हार्मोन (GH) वर अवलंबून असतो. हे हार्मोन्स मोठ्या लोकांसाठीही तेवढेच महत्वाचे असते. या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे जसे गंभीर आजार होऊ शकतात तसेच त्याच्या अधिकतेमुळेही होऊ शकतात. हे हार्मोन्स मेंदूमध्ये असलेल्या पिट्यूटरी ग्रंथीमध्ये तयार होते. हे हार्मोन हाडांच्या क्षमतेवर आणि शारीरिक ताकदीवर मोठ्या प्रमाणात परिणाम करते. जर मुलांमध्ये हे हार्मोन कमी असेल तर त्याचे परिणाम खूप गंभीर परिणाम होऊ शकतात.

ग्रोथ हार्मोन

ग्रोथ हार्मोन (HGH) सुमारे 20 वर्षांपर्यंत मुलांच्या वाढीवर, शरीराच्या रचनेवर आणि क्षमतेवर परिणाम करते. या वयानंतर हे हार्मोन्स शरीराचे संतुलन राखण्यास हातभार लावते. तथापि, 30 ते 50 वयोगटादरम्यान या हार्मोन्सचे जास्त प्रमाण आणि कमतरता एखाद्या व्यक्तीवर वाईट परिणाम करु शकते. या वयात हे हार्मोन्स सर्वाधिक प्रमाणात तयार होते. त्यामुळे अनेक प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात.

मुलांसाठी ग्रोथ हार्मोन आवश्यक

मेंदूच्या पिट्यूटरी ग्रंथीमध्ये ग्रोथ हार्मोन तयार होते आणि तेथून ते ब्लडमध्ये पोहोचते. जर लहानपणी मुलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर बऱ्याचदा पिट्यूटरी ग्रंथीवर परिणाम होतो, ज्यामुळे मुलांचा (Children) शारीरिक विकास मंदावतो. परिणामी, मुले कमकुवत राहतात. त्यांचे स्नायू आणि हाडे मजबूत होत नाहीत.

मोठ्या लोकांमध्ये समस्या

ग्रोथ हार्मोनचे सर्वाधिक उत्पादन 30 ते 50 वर्षे वयोगटादरम्यान होते. वाढत्या वयात हाडांची लांबी आणि रुंदी वाढत नाही, त्यामुळे हे हार्मोन या वयोगटातील लोकांना ताकद देते. हार्मोन्सच्या जास्त उत्पादनामुळे, कधीकधी हाडे विकृत होऊ शकतात. हे अनेक वेळा पाहिले गेले आहे. मोठ्या लोकांमध्ये हाडांची वाढ यासारख्या समस्यांसाठी हे हार्मोन्स मोठ्या प्रमाणात जबाबदार असते.

जीएच कमतरतेची लक्षणे

शारीरिक कमजोरी, व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे, हाडे कमकुवत होणे, वारंवार फ्रॅक्चर होणे, जास्त थकवा, चिंता आणि नैराश्य आणि पोटाभोवती फॅट जमा होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT