हातावरील टॅनिंग कमी करायची असेल तर ... Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care Tips : हातावरील टॅनिंग कमी करायची असेल तर ...

हळद (Turmeric) त्वचेचा टॅन (Tan) सुधारण्यास मदत करते.

दैनिक गोमन्तक

Skin Care Tips : कडक उन्हात त्वचा (Skin) लगेच काळपट पडते. तसेच त्वचा कोरडी (Dry) आणि निर्जीव देखील होते. सूर्याच्या अतिप्रखर किरणांमुळे त्वचा टॅन (Tan) होते. टॅनिंगमुळे अकाली वृद्धत्व येवू शकते. आपले हात सर्वात अधिक सूर्यासमोर (Sun) येतात. यामुळे सर्वात जास्त हानी देखील हातांनाचा (Hand) होते. यामुळेच सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव करणे कठीण आहे. अशावेळी आपण घरगुती उपाय वापरुन टॅन (Tan) दूर करू शकतो.

दही आणि हळदचे पॅक -

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स मुबलक प्रमाणात असल्याने ते त्वचेला मॉइश्चराइझ करतात. तसेच हळद त्वचेचा टॅन सुधारण्यास मदत करते. एक वाटी दही घ्यावे. त्यात 1 चमचा हळद पावडर मिक्स करावी. याचे एकत्रित मिश्रण आपल्या टॅन झालेल्या हातांवर लावावे. सुमारे 20 मिनिटे हातावर हे पॅक ठेवावे. त्यानंतर हात पाण्याने स्वच्छ धुवावे.

लिंबाचा रस -

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे त्वचेच्या पेशींना अतिनील किरणांपासून बचाव करते. एका वाटीत लिंबाचा रस घ्यावा आणि त्यात टॅन झालेले हात कमीत कमी 15 मिनिटे ठेवा. नंतर आपले हाथ थंड पाण्याने स्वच्छ धुवावे. यानंतर त्वचेला मॉइश्चराइझ करावे. असे केल्याने हातावरील टॅन कमी होण्यास मदत मिळते.

बदामची पेस्ट

बदाम खाणे आरोग्यासाठी फायद्याचे असते. तसेच यात मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे असतात. हे त्वचेसाठी उपयुक्त असते. यासाठी 5 ते 6 बदाम घ्यावे. त्या रात्रभर भिजत ठेवावे. नंतर बदाममध्ये थोडे दूध मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट हाताला 20 मिनिटे लाऊन ठेवावे. नंतर हात स्वच्छ पाण्याने धुवावे.

चंदन आणि हळद

दोन चमचा चंदन पावडर आणि हळद घेऊन याचे चांगले मिश्रण तयार करावे. त्यात 2 ते 3 थेंब गुलबजल मिसळून पेस्ट बनवावी. ही पेस्ट हाताला लाऊन 30 मिनिटे ठेवावी. नंतर हात स्वच्छ पाण्याने धुन घ्यावे. या पेस्टमुळे त्वचेवरील टॅन कमी होण्यास मदत मिळते.

कोरफड जेल

कोरफडाचे अनेक फायदे आहेत. यामध्ये एंटीऑक्सीडेंट हा गुण असतो. यामुळे त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून बचाव करतात. हे हातावरील टॅनिंग काढून टाकण्यास मदत करते. कोरफडच्या पानांतून जेल काढून घ्या आणि आपल्या हातावर लावावे. रात्रभर जेल लाऊन ठेवावे. सकाळी स्वच्छ पाण्याने हात धुवावे. असे केल्याने हातावरील टॅनिंग कमी होण्यास मदत मिळते.

काकडीची पेस्ट

काकडीमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे असतात. यामुळे आपली त्वचा ताजी राहते. काकडीकण्या पेस्टमुळे आपली त्वचा चमण्यास मदत मिळते. यासाठी दोन काकडीचा रस घ्यावा. यात लिंबाचा रस टाकावा. ही पेस्ट हातावर 30 मिनिटे लावून ठेवावी. त्यानंतर हात स्वच्छ धुवावे. यामुळे हातावरील टॅनिंग कमी होण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT