Second Hand Smartphone Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Second Hand Smartphone खरेदी करायचा विचार करताय? चुकूनही करु नका हे काम

स्मार्टफोनचा वापर जवळपास प्रत्येक कामात केला जातो

दैनिक गोमन्तक

Second Hand Smartphone: सध्या स्मार्टफोनचा वापर जवळपास प्रत्येक कामासाठी केला जातो. जुना फोन खराब झाल्यावर अनेक लेक लगेच नवा फोन खरेदी करण्याचा विचार करतात. पण नवीन फोन खरेदी करणे अनेकांसाठी कठीण आहे. नवीन स्मार्टफोनसाठी चांगले बजेट आवश्यक असते. काही वापरकर्त्यांना सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करण्याचा करण्याचा विचार करतात.

जर तुम्ही देखील काही कारणास्तव नवीन सेकंड हँड फोन खरेदी करत असाल तर तुम्ही काही चुका अजिबात करू नका. कारण कधी कधी थोडासा निष्काळजीपणा देखील मोठी समस्या निर्माण करु शकतो.

  • तुम्ही कोणत्या सोर्सने फोन खरेदी करत आहात

जर तुम्ही सेकंड हँड फोन घेणार असाल तर लगेच ऑनलाइन वेबसाइटवर खरेदी करु नका. हे खूप महत्वाचे आहे की आपण प्रथम ओळखीच्या लोकांशी व्यवहार केले पाहिजे. अन्यथा केवळ विश्वसनीय साइटची मदत घ्यायला हवी. सेकंड हँड उपकरणांसाठी, तुम्ही Olx, Ebay, Cashify सारख्या वेबसाइट्सना भेट देऊ शकता. येथे वापरकर्त्याच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते.

  • प्रत्येक डिव्हाइस निट तपासा

जर तुम्ही ऑनलाइन फोन खरेदी करत असाल तर फोनचे डिव्हाइस नीट तपासावे. काही वेळा काही नुकसान दिसत नाही, तुम्ही ज्या खरेदीदाराकडून फोन विकत घेत आहात त्यांच्याकडून फोनच्या प्रत्येक बाजुने फोटो मागवणे आवश्यक आहे.

  • योग्य किंमतीत फोन खरेदी करावे

फोनच्या अचूक किंमतीबद्दल माहिती नसल्यामुळे अनेक वेळा लोकांची फसवणूक होते. त्यामुळे जर तुम्ही सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करत असाल तर त्या स्मार्टफोनची किंमत जाणून घेणे गरजेचे आहे.नंतर फोनची स्थिती आणि वापरलेल्या वेळेच्या आधारावर वाजवी किंमतीवर सेटलमेंट करा. याशिवाय फोन खरेदी केल्याचा पुरावा तुमच्याकडे जतन करा .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT