Dhoop Batti Dainik Gomantak
लाइफस्टाइल

झाडांच्या वाढीसाठी 'असा' करा धुपच्या राखेचा वापर

Puja Bonkile

Dhoop Batti: अनेक घरांमध्ये, मंदिरात धूप लावली जाते. यामुळे वातावरणात सकारात्मकता येते. पण या धुपची राख फेकुन देण्याएवजी तुम्ही त्याचा अनेक कामांसाठी करू शकता. ही राख कशी वापरायची आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊया.

  • धुपच्या राखेचे काय करायचे? 

जर तुमची धुप कोणत्याही केमिकलशिवाय बनवली असेल तर तुम्ही ती वनस्पतींसाठी वापरू शकता. त्याचबरोबर धुपमध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल असतील तर त्याची राख झाडांच्या मुळात टाकू नका. असे केल्याने केमिकलचा झाडांच्या मातीवर विपरित परिणाम होऊ शकतो. ती कशी तयार केली आहे याची सर्व माहिती धुपच्या बॉक्सवर दिलेली असते. ती वाचुनच त्याचा वापर करावा.  

  • रोज राख घालू नका 

आपल्याला दररोज झाडांमध्ये राख घालण्याची आवश्यकता नाही. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून चार वेळा राख वापरू शकता.

  • झाडांमध्ये धुपची राख टाकावी

झाडांमध्ये धुपची राख खतामध्ये मिक्स करून टाकल्यास अनेक फायदे होतात. यासाठी एका बाटलीतील पाण्यात धुपची राख मिक्स करून ती झाडांमध्ये टाकावी. महिन्यातून 3-4 वेळा असे केल्यास तुमच्या झाडांना खूप फायदा होईल. 

  • राख घालण्याचे फायदे

नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या धुपपासून बनवलेली राख झाडांसाठी खूप फायदेशीर आहे. राखेमध्ये असलेले घटक रोपासाठी खताप्रमाणे काम करतील आणि झाडांची वाढ योग्य होईल. तुम्ही ही राख फुलांच्या रोपांमध्ये देखील घालू शकता. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT