Hair Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tips For Natural Black Hair: 'या' हिरव्या भाजीच्या मदतीने पांढरे केस होतील नैसर्गिकरित्या काळे

तुम्हाला एक रुपयाही खर्च न करता तुमचे पांढरे होणारे केस नैसर्गिकरित्या कसे काळे करू शकता.

Puja Bonkile

How to Make Hairs Black Naturally Without Dye: जगात वाढते वायुप्रदूण आणि दूषित पाणी तसेच खाण्याच्या वाईट सवयींमुळे लहान वयातच केस पांढरे होण्यास सुरुवात झाली आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध महागडे रासायनिक प्रोडक्ट वापरतात.

पण फायदा होत नाही. पांढऱ्या केसांसाठी लौकी फायदेशीर असता. याचा वापर करून कमी खर्चात तुम्हाला तुमच्या केसांचे सौंदर्य परत मिळवू शकता.

  • केसांसाठी लौकी किती फायदेशीर

पांढरे केस कमी करण्यासाठी आणि ते काळे करण्यासाठी आठवड्यातून दोनदा लौकीचे तेल लावावे. हे तेल तुम्ही घरीही बनवू शकता. ही आहे बनवण्याची पद्धत-

हे बनवण्यासाठी लौकी घ्यावी. आता ते चांगले धुवून त्याचे छोटे तुकडे करून आठवडाभर उन्हात वाळवावे. यानंतर एका कढईत 250 ग्रॅम खोबरेल तेल चांगले गरम करून त्यात लौकीचे तुकडे टाकून चांगले उकळून घ्यावे.

आता गॅस बंद करा आणि हे मिश्रण थंड होईपर्यंत ठेवावे. ते थंड झाल्यावर एका डब्ब्यात साठवावे. यानंतर रात्री झोपण्यापूर्वी हे तेल केसांना लावावे. त्यानंतर सकाळी शॅम्पू करून स्वच्छ केस धुवावे. 1 महिन्याच्या आत तुम्हाला तुमच्या केसांमध्ये बदल दिसून येईल.

  • लौकीचा रस

याशिवाय लौकीचा रस आणि भाज्यांचे सेवन करूनही फायदा होऊ शकतो. त्याचा रस शरीराला डिटॉक्स करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

तुम्ही रोज रिकाम्या पोटी त्याचा रस प्यायला सुरुवात करावी. यामुळे केसांचे आरोग्य देखाल चांगले राहते.

पावसाळ्यात केसांची घ्या काळजी

  • प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन

निरोगी केसांसाठी प्रथिने युक्त आहार घेणे गरजेचे आहे. याच्या मदतीने तुम्ही केसांचे मुळ मजबूत करू शकता. चीज आणि बीन्स इत्यादी प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत.

  • सुकामेवाचे सेवन

झिंक आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असलेला आहार घ्यावा. अक्रोड, बदाम आणि काजू यांसारख्या सुक्यामेव्यांचा आहारात समावेश करू शकता. याशिवाय, तुम्ही फॅटी अॅसिडने समृद्ध असलेल्या चिया बिया, मासे, टोफू आणि फ्लेक्स सीड्स इत्यादींचा समावेश करू शकता.

  • योग्य शॅम्पुचा निवड करावी

पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी केसांसाठी असा शॅम्पू निवडा ज्यामुळे केसांना कोणतीही हानी होणार नाही. केसांच्या प्रकारानुसार शॅम्पू निवडावा. केस निरोगी ही काळजी घेणे गरजेचे आहे.

  • इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा वापर टाळावा

पावसाळ्यात केस वाळवण्यासाठी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करु नका. जर तुम्ही केसांसाठी जास्त उष्णतेचे उपकरण वापरत असाल तर त्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच आपले केस नैसर्गिकरित्या कोरडे करण्याचा प्रयत्न करा.

  • कोरफड जेल

केसांसाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता. कोरफडमध्ये अ, क आणि ई जीवनसत्त्वे असतात. हे 3 जीवनसत्त्वे केस वाढवण्यासाठी आणि त्यांना चमकदार बनवण्याचे काम करतात. कोरफडीमध्ये व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक अॅसिड सारखी जीवनसत्त्वे असतात. हे केस गळणे कमी करते

  • तेलाने मसाज करावी

पावसाळ्यात नियमितपणे केसांच्या मुलात मसाज करावी. यामुळे तुमचे केस निरोगी राहतील. मसाज केसांना पोषण मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT