Tech Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tech Tips: वाय-फाय पासवर्ड विसरलाय? फक्त करा 'हे' काम

वायफाय पासवर्ड विसरल्यास पुढील टिप्स वापरून सर्च करू शकता.

Puja Bonkile

how to see saved wifi password in laptop know steps read full story

तुमच्यापैकी अनेकजण घर आणि ऑफिसमध्ये वाय-फाय वापरत असतील. अनेक वेळा आपण वाय-फाय पासवर्ड विसरतो. अशावेळी आपले काम करणे थांबते. बरं पासवर्ड विसरल्यानंतरही तुम्ही वाय-फाय पासवर्ड सहज शोधू शकता. लॅपटॉपमध्ये आधीच कनेक्ट केलेल्या Wi-Fi चा पासवर्ड कसा काढायचा हे जाणून घेऊया.

लॅपटॉपमध्ये कनेक्ट केलेले वाय-फाय कसा शोधाल

सर्वात पहिले संगणक वाय-फायशी कनेक्ट करा.

इंटरनेटशी कनेक्ट केल्यानंतर, कंट्रोल पॅनलवर जा आणि नेटवर्क आणि शेअरिंग सेंटर ऑप्शनवर क्लिक करा.

आता चेंज ॲडॉप्टर सेटिंग्ज वर क्लिक करा.

येथे क्लिक केल्यानंतर ज्या Wi-Fi नेटवर्कचा पासवर्ड तुम्ही विसरलात त्यावर राईट क्लिक करा.

राइट क्लिक केल्यावर तुम्हाला स्टेटस ऑप्शन दिसेल.

त्यावर क्लिक करा.

यानंतर दिलेल्या वायरलेस प्रॉपर्टीजवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला कनेक्शन आणि सिक्योरीटी ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.

येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेटवर्क सिक्युरिटीचा ऑप्शन दिसेल.

याच्या खाली तुम्हाला शो कॅरेक्टर्सचा पर्याय मिळेल, येथे क्लिक करून तुम्ही तुमच्या Wi-Fi चा पासवर्ड जाणून घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT