Mosquito Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Remedies For Mosquito: घरात डास असतील तर करा 'हे' 6 घरगुती उपाय

Home Remedies For Mosquito: तुमच्या घरात डास असतील तर महागडे लिक्विड न वापरता घरगुती उपायांनी ही समस्या कमी करू शकता.

Puja Bonkile

how to remove Mosquito with home remedies

घरातील घाणीमुळे डासांची उत्पत्ती होण्याचा धोका तर वाढतोच शिवाय आजारही पसरू लागतात. डास चावल्याने डेंग्यू, मलेरिया आणि ताप इत्यादी समस्या उद्भवू शकतात. अशावेळी त्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे.

डासांना दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची प्रोडक्ट उपलब्ध आहेत. घरगुती उपायांसह घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून डास दूर करू शकता. चला आम्ही तुम्हाला हे उपाय कोणते आहेत.

लिंबू आणि मोहरीचे तेल


घरातील डास दूर करण्यासाठी लिंबू आणि मोहरीचे तेल वापरू शकता. यासाठी एक लिंबू घ्या, ते अर्धे कापून घ्या आणि त्याचा लगदा काढा. त्यात मोहरीचे तेल घालून लवंग-कापूर टाकून जाळावे. ते जाळल्याने डास दूर होऊ शकतात.

तुळशीची पाने


अनेकांच्या घरात तुळस असते. तुळशीचा उपयोग औषधी पद्धतीने केला जातो. याचा वापर करून घरात डास येण्यापासून रोखता येईल. यामुळे घरातील डास दूर होतात. घरात डास येऊ नयेत म्हणून तुळशीची पाने दार आणि खिडक्यांवर ठेवावे.

पेपरमिंट ऑइल


पेपरमिंट ऑइलचा वापर डासांपासून बचाव करण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी पेपरमिंट तेलाचे काही थेंब पाण्यात मिक्स करावे. नंतर स्प्रे बाटलीत साठवा. तुम्ही ते त्वचेवर लावू शकता. यामुळे डास चावणार नाहीत आणि पळून जातील.

कापूर


कापूरच्या मदतीने तुम्ही डासांना दूर करू शकता. हे करण्यासाठी कापूरच्या गोळ्या बारीक करून कोणत्याही तेलात मिसळा आणि या तेलाने दिवा लावा. असे केल्याने डास पळून जातात.

कडुलिंबाचा वापर


कडूलिंबाच्या पानांचा वापर बॅक्टेरिया आणि जंतू नष्ट करण्यासाठी केला जातो. कडुलिंबाची पाने घरातील डास दूर करू शकतात. या पानांच्या वासाने डास पळून जातात. कडुलिंबाचे तेल त्वचेवर लावून वापरू शकता. यामुळे डास चावत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT