Stress  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Stress Hormones: शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढीची काय आहेत लक्षणे? दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय

Stress And Hormone Health: शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स असतात. हे हार्मोन्स आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. तथापि, हार्मोन्सची पातळी कमी किंवा जास्त झाल्याने अनेक गंभीर शारीरिक आणि मानसिक आजारांचा धोका वाढू शकतो.

Manish Jadhav

शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स असतात. हे हार्मोन्स आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. तथापि, हार्मोन्सची पातळी कमी किंवा जास्त झाल्याने अनेक गंभीर शारीरिक आणि मानसिक आजारांचा धोका वाढू शकतो. कधीकधी ताणतणावामुळे हार्मोनल संतुलन देखील बिघडू शकते. ताणतणावाच्या बाबतीत शरीरातील स्ट्रेस हार्मोन (कॉर्टिसॉल) चे संतुलन देखील बिघडते. जर त्याचे संतुलन बिघडले तर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

शरीरातील स्ट्रेस (Stress) हार्मोन (कॉर्टिसॉल) चे संतुलन बिघडल्यावर काही लक्षणे दिसतात. बऱ्याचदा आपण अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. तथापि, काही काळानंतर ही लक्षणे तीव्र होऊन शरीराला गंभीर हानी देखील पोहोचवू शकतात. स्ट्रेस हार्मोन (कॉर्टिसॉल) च्या अतिरेकामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्याची अगदी किरकोळ लक्षणे दिसून येतात, मात्र जर ती वेळीच ओळखली तर परिस्थिती बिकट होण्यापासून रोखता येते.

स्ट्रेस हार्मोन्सची लक्षणे कोणती?

शरीरात स्ट्रेस हार्मोन (कॉर्टिसॉल) ची पातळी वाढली की काही लक्षणे दिसून येतात. सुरुवातीला ही लक्षणे खूपच सौम्य असली तरी ती ओळखून तात्काळ उपचार करणे गरजेचे ठरते. या लक्षणांमध्ये वजन वाढणे, पोट आणि चेहऱ्यावर वाढलेली चरबी आणि सतत थकवा जाणवणे यांचा समावेश होतो. तसेच, रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके जलद होणे, पोटदुखी, अपचन किंवा बद्धकोष्ठतेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय, स्नायू दुखणे, झोप न लागणे, निद्रानाश, चिडचिड, ताण जाणवणे या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. यामुळे मधुमेह (Diabetes) आणि हृदयरोग देखील होऊ शकतो.

स्ट्रेस हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी काय करावे

जेव्हा वाढलेल्या स्ट्रेस हार्मोनची (कॉर्टिसॉल) लक्षणे दिसतात तेव्हा सर्वात आधी ताण घेणे थांबवणे गरजेचे ठरते. यासोबतच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर तुम्हाला तुमच्या स्ट्रेस हार्मोनची (कॉर्टिसोल) पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. यासोबतच आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी उपचारही केले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT