Masala Corn Chaat Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Masala Corn Chaat: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी मसाला कॉर्न चाट !

नाश्त्यात निरोगी आणि पौष्टिक काहीतरी खायचे असेल तर मसाला कॉर्न चाट नक्की ट्राय करु शकता.

दैनिक गोमन्तक

तुम्हीही सकाळी काहीतरी हेल्दी स्नॅक्सचे सेवन करू शकता. जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल किंवा संध्याकाळी काही हलके खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही कोणताही सोपा नाश्ता करून पोट भरू शकता.

तुम्ही अनेक गोष्टींपासून स्नॅक्स बनवू शकता. कॉर्न साधारणपणे सर्वांनाच आवडते. तुम्हालाही कॉर्न आवडत असेल तर आम्ही तुम्हाला कॉर्नपासून बनवलेल्या स्नॅक्सची रेसिपी सांगणार आहोत. या रेसिपीचे नाव मसाला कॉर्न चाट आहे. हा पदार्थ बनवायला अगदी सोपी आहे.

  • मसाला कॉर्न चाटसाठी लागणारे साहित्य

कॉर्न - १ वाटी

कांदा - १ वाटी

टोमॅटो - १ वाटी

हिरवी मिरची - २ चिरून

मीठ - चवीनुसार

जिरे पावडर - अर्धा टीस्पून

चाट मसाला - अर्धा टीस्पून

लिंबाचा रस - १ टीस्पून

कोथिंबीर - गार्निशसाठी

सर्वात पहिले कॉर्न पाण्यात टाकून उकळवे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून वेगवेगळे ठेवावे. आता एका बाऊलमध्ये कॉर्न, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, मीठ घालून चांगले मिक्स करावे. नंतर त्यात जिरेपूड, चाट मसाला टाका आणि त्यात लिंबाचा रस पिळून घ्या. हे साहित्य चांगले मिक्स करावे. त्यात चिरलेली कोथिंबीर पण घाला. खाण्यासाठी वेगळ्या भांड्यात सर्व्ह करा.

मसाला कॉर्न चाट आरोग्यासाठी (Health) फायदेशीर आहे कारण कॉर्न केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर त्यात समाविष्ट केलेल्या कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लिंबू देखील आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा पॅक फूड, जंक फूड खाण्याऐवजी हा आरोग्यदायी नाश्ता बनवा आणि खा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT